vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

ई-पीक पाहणी नोंदणी २४ मेपूर्वी करा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आवाहन

ई-पीक पाहणी नोंदणी २४ मेपूर्वी करा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आवाहन

अहिल्यानगर, प्रतिनिधी : – उन्हाळी हंगाम २०२५-२०२६ करिता राज्यात ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणीस सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी २४ मे २०२६ पूर्वी आपल्या पिकांची अचूक नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

पिकांची नोंदणी न केल्यास सातबारा उताऱ्यावर पीक नोंद कोरी राहील व ती नंतर भरता येणार नाही. परिणामी, अवकाळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या काळात मिळणारी मदत, पीक विमा तसेच शासकीय अनुदान मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

शासन निर्णयानुसार ई-पीक पाहणी प्रक्रिया दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. शेतकरी स्तरावर ८ एप्रिल ते २४ मे २०२६ या कालावधीत, तर सहाय्यक स्तरावर २५ मे ते ८ जुलै २०२६ या कालावधीत पिकांची नोंद करण्यात येईल.

उन्हाळी हंगामात शेतात उभे असलेले पीक, कायम पड तसेच चालू स्थितीत पड असलेल्या जमिनींची नोंद करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेची शंभर टक्के अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्व तहसीलदारांना निर्देश देण्यात आले आहेत.

भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी विहित कालावधीत मोबाईलद्वारे पीक नोंदणी पूर्ण करावी, असे‌ आवाहनही श्री. आशिया यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंतीचा उत्सव समिती बुलढाणा..प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांची यावर्षी रेलचेल!

vishwatmaklokswamivarta

भारतीय हवाई दलाच्या चिनूक विमानांनी हिमाचल प्रदेशातील चंबा इथल्या मणिमहेश तीर्थक्षेत्रातून अडकलेल्या यात्रेकरूंना यशस्वीरित्या बाहेर काढले

vishwatmaklokswamivarta

खंडोबा देवाची यात्रेनिमित्त पाल परिसरातील वाहतूक मार्गात बदल*

vishwatmaklokswamivarta

प्रशासकीय गतिमानता, कार्यक्षमता वृद्धी व ज्ञानसंवर्धनासाठी अमरावती विभागात ‘महा-साधना सप्ताह’- विभागीय आयुक्त नयना गुंडे• विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘iGOT कर्मयोगी’ पोर्टलवरील प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक समाधी मंदिर भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थळ-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मोठी गती…

vishwatmaklokswamivarta

पॉश” ची अंमलबजावणी न करणाऱ्या राज्यातील 672 कार्यालयांना कारणे दाखवा नोटीसा