vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

नागरिकांनी एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

नागरिकांनी एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

जालना, प्रतिनिधी : आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना असुन राज्यात महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजने सोबत एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. सदर योजने अतंर्गत लाभार्थी रुग्णांना अंगीकृत रुग्णांलयामध्ये रुपये 5 लाखांपर्यंत मोफत उपचार देण्यात येतात. तसेच 70 वर्षावरील सर्व व्यक्ती हे वय वंदना कार्डचे लाभार्थीं आहेत. वय वंदना योजनेअतंर्गत लाभार्थी रुग्णांना अंगीकृत रुग्णांलयामध्ये रुपये 5 लाखांपर्यंत मोफत उपचार देण्यात येतात.तसेच आयुष्मान भारत अंर्तगत स्माईल (SMILE) योजनेचे लाभार्थीं ट्रान्सजेंडर हे आहेत. आयुष्मान भारत स्माईल (SMILE) योजने अंर्तगत लाभार्थीना रुग्णांना तसेच आयुष्मान भारत नमस्ते (नमस्ते) योजने अंर्तगत लाभार्थीना रुग्णांना अंगीकृत रुग्णांलयामध्ये रुपये 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार देण्यात येतात.

त्या अनुषंगाने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे आज दि. 26 ऑगस्ट, 2025 रोजी जिल्ह्यातील गोल्डन कार्ड पात्र लाभार्थ्यांची संख्या 18 लाख 34 हजार असुन त्यापैकी 6लाख 74 हजार एवढे कार्ड तयार करण्यात आले आहे. उर्वरीत एकुण 11 लाख 60 हजार लाभार्थ्यांचे ई के.वाय.सी करण्यात येणार आहे.

एकत्रित आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना आणि वय वंदना योजनेचे ई-केवायसी कामचे उद्धिष्ट पुर्ण करण्याकरिता दि. 01 ऑगस्ट, 20254 पासून जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या योजनेतंर्गत आयुष्मान कार्डसाठी पुढील कागदपत्रांची आवश्यकता आहे. यामध्ये 12 अंकी ऑनलाईन राशन कार्ड क्रमांक, आधार कार्ड, आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल तर वय वंदना कार्डसाठी आधार कार्ड, आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल ही कागदपत्र आवश्यक आहे. स्माईल (SMILE) योजने अंर्तगत आयुष्मान कार्ड e-KYC करण्यासाठी 12 अंकी ऑनलाईन राशन कार्ड क्रमांक, आधार कार्ड, आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाइल तर नमस्ते योजने अंर्तगत आयुष्मान कार्ड e-KYC करण्यासाठी आधार कार्ड आणि आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल लाभार्थ्यांकडे असणे आवश्यक आहे.

तसेच आपल्या भागातील आशा सेविका,स्वस्त धान्य दुकानदार,आपले सरकार सेवा केंद्र,महा ई-सेवा केंद्र आणि योजने अंतर्गत अंगिकृत रुग्णालयात आरोग्यमित्रांना भेटून सर्व नागरिकांनी आयुष्मान कार्ड आणि वय वर्ष 70 किंवा 70 पेक्षा जास्त वय असलेल्या सर्व जनतेनी वय वंदना कार्ड ई-के.वाय.सी बनवुन घ्यावे. तसेच या विशेष मोहिमे मध्ये जास्तीत-जास्त जनतेने,अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेऊन जास्तीत-जास्त लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड आणि वय वंदना कार्डचे ई-के.वाय.सी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आाशिमा मित्तल यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

दर महिन्याला रोजगार मेळाव्याद्वारे जास्तीत-जास्त युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रोजगार मेळाव्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात नियुक्तीपत्र प्रदान

vishwatmaklokswamivarta

अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांची कुडाळ तालुक्यातील विविध कार्यालयांना भेट महसूल कामकाजाचा घेतला सविस्तर आढावा

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

शेतकऱ्यांना कर्जमाफी हा मास्टरस्ट्रोक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामाजिक भान बाळगून अर्थव्यवस्थेला चालना देणारा अर्थसंकल्प

जालन्यात उद्या मंगळवारी त्रैभाषिक गझल मुशायाराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना-देशात महाराष्ट्र आणि राज्यात छत्रपती संभाजीनगर प्रथम

vishwatmaklokswamivarta