vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणस्थळी जलपूजन संपन्न

नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणस्थळी जलपूजन संपन्न

      नवी मुंबई प्रतिनिधी    स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर स्वत:च्या मालकीचे धरण असणारी नवी मुंबई ही एकमेव महानगरपालिका असून मोरबे धरणामुळे नवी मुंबईची ओळख जलसंपन्न महानगरपालिका अशी आहे. पाताळगंगा नदीची उपनदी असलेल्या धावरी नदीवर खालापूर तालुक्यात असलेले 450 द.ल.लि. प्रतिदिन क्षमतेचे मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून महाराष्ट्र राज्याचे वने मंत्री ना. श्री. गणेश नाईक यांच्या शुभहस्ते, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोरबे धरणाचे जलपूजन पारंपारिक पद्धतीने संपन्न झाले.

         याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनील पवार व डॉ.राहुल गेठे, शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे आणि इतर विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. तसेच माजी खासदार श्री.संजीव नाईक, माजी महापौर श्री.सागर नाईक, माजी नगरसेवक सर्वश्री डॉ.जयाजी नाथ, अनंत सुतार, रवींद्र इथापे, रामचंद्र घरत, दशरथ भगत, श्रीम.नेत्रा शिर्के व इतर मान्यवर उपस्थित होते.

 सध्या ग्लोबल वॉर्मिंगचा व वातावरण बदलाचा धोका लक्षात घेऊन पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने जागरूकतेने गतिमान पावले उचलण्याची गरज विशद करीत महाराष्ट्र राज्याचे वने मंत्री ना.श्री. गणेश नाईक यांनी 5 वर्षाच्या काळात राज्यभरात 250 कोटी वृक्षारोपणाच्या दृष्टीने नियोजनबद्ध पावले उचलली जात असल्याचे सांगितले. स्वत:च्या मालकीचे धरण असणारी स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडातली नवी मुंबई ही एकमेव महानगरपालिका असून आगामी काळातील वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी इतर जलस्त्रोतांचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. मोरबे धरण प्रकल्पानजिकच्या जागेत मनोरंजन केंद्र विकसित करणे तसेच सोलार पॅनलद्वारे ऊर्जा निर्माण करणे या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेस उत्पन्नाचे स्त्रोत प्राप्त होतील असेही ते म्हणाले. मोरबे धरणातील जलसाठा शुद्ध राहील यादृष्टीने तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

         नमुंमपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी मोरबे धरण यावर्षी ऑगस्ट महिन्यातच पूर्ण भरले असून ही निसर्गाची कृपा असून नवी मुंबईकरांसाठी आनंदाची गोष्ट असल्याचे मत व्यक्त केले. नवी मुंबईकरांना स्वच्छ, शुध्द व पुरेसा पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने जल वितरणाचे नियोजन केले असल्याची माहिती देत आयुक्तांनी सन 2055 पर्यंत 40 ते 45 लाख लोकसंख्या होईल हे लक्षात घेऊन पाताळगंगा, पोशीर व शिलार या धरणांतून पाणीसाठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे पारसिक हिल बेलापूर ते महापे जंक्शन पर्यंत 15 कि.मी. जलवाहिन्यांचे काम नियोजित असून त्याव्दारे मोरबे धरणाचा पाणीपुरवठा संपूर्ण महापालिका क्षेत्रात सुरू होईल असेही त्यांनी सांगितले. जलस्त्रोतांची शाश्वतता वाढवली पाहिजे यादृष्टीने पिण्याव्यतिरिक्त वापरासाठी पुनर्प्रक्रियाकृत पाणी पुरवण्याची अंमलबजावणी सुरू असल्याचे सांगत त्यांनी पिण्याच्या पाण्याचा उपयोग नागरिकांनी पाण्याचे महत्व ओळखून काटकसरीने करावा असेही आवाहन त्यांनी केले.

   निसर्गाच्या कृपेमुळे मोरबे धरण यावर्षी ऑगस्ट महिन्यातच पूर्ण भरले असल्याबद्दल आनंद व्यक्त करीत अतिरिक्त शहर अभियंता श्री अरविंद शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.       मोरबे धरण क्षेत्रात आजतागायत 3901 मिमी पावसाची नोंद झालेली असून पाण्याची पातळी पूर्ण 88 मीटरपेक्षा जास्त झालेली आहे. धरणात 190.89 द.ल.घ.मी. इतका जलसाठा असून त्यामधील पाण्याचा आज धरणाचे दरवाजे 25 सेमीने उघडून विसर्ग करण्यात आला.    अशाचप्रकारे प्रत्येक वर्षी मोरबे धरणातील जलसाठा पूर्ण भरावा अशी प्रार्थना करीत परंपरेनुसार जलपूजन संपन्न झाले. मोरबे धरणामध्ये मुबलक पाणी साठा उपलब्ध असला तरी सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचे महत्व ओळखून पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहनही करण्यात येत आहे.

000000

संबंधित पोस्ट

कर्णपुरा यात्रोत्सव पूर्वतयारी आढावाशासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी स्वामी

vishwatmaklokswamivarta

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या संकेतस्थळाचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन !

vishwatmaklokswamivarta

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षेबाबत काळजी घ्यावी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

टीम इंडिया विजयी..! चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वर मोठ्या दिमाखात आपले नावं कोरले… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

शंभर शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे सामाजिक कार्याचा गौरव म्हणून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित…

vishwatmaklokswamivarta

बारावी परीक्षेची ऑनलाईन आवेदन पत्रे भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; विद्यार्थ्यांना शासनाचा दिलासा

vishwatmaklokswamivarta