vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

येत्या चार वर्षात मुंबईतील चित्रपट नगरीचा कायापालट करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· ‘फिक्की फ्रेम्स – अ सिल्वर जुबली ऑफ व्हिजन’ मुलाखत प्रसंगी केले आश्वस्त· सायबर क्राईम विरोधात “डिजिटल वॉरफेअर” मध्ये सहभागी होण्याचे चित्रपट उद्योगाला आवाहन

येत्या चार वर्षात मुंबईतील चित्रपट नगरीचा कायापालट करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· ‘फिक्की फ्रेम्स – अ सिल्वर जुबली ऑफ व्हिजन’ मुलाखत प्रसंगी केले आश्वस्त· सायबर क्राईम विरोधात “डिजिटल वॉरफेअर” मध्ये सहभागी होण्याचे चित्रपट उद्योगाला आवाहन,

मराठी नाटक व सिनेमा आशयघन दर्जेदार; मराठी चित्रपटांना चांगले दिवस..

मुंबई, प्रतिनिधी:- मनोरंजनाची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये चित्रपट उद्योगासाठी आवश्यक परिसंस्था संपूर्ण विकसित झाली असून मुंबई चित्रनगरीचा येत्या चार वर्षात संपूर्णपणे कायापालट करण्यात येईल. चित्रपट क्षेत्रासाठी निर्मितीपासून प्रदर्शनापर्यंत आवश्यक सुविधासह चित्रपटनगरीचा हा विकास असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

फिक्की फ्रेम्स – अ सिल्वर जुबली ऑफ व्हिजन’ कार्यक्रमात अभिनेते अक्षय कुमार यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी आणि चित्रनगरीच्या विकासाबाबत प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.चित्रपट क्षेत्रातील विखुरलेल्या घटकांसाठी चित्रनगरीला आयकॉनिक स्वरूप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सिनेमाच्या आणि चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात मुंबईचे महत्त्वपूर्ण स्थान असून येथे चित्रपट उद्योगासाठी आवश्यक परिसंस्था विकसित झाली आहे. सळसळत्या उत्साहाने भारावलेल्या या क्षेत्रातील निर्मितीपासून प्रदर्शनापर्यंत आवश्यक संकलन, चित्रीकरण याचे संबंधित तंत्रज्ञान याचा मोठा विस्तार झाला आहे. मुंबई शहरालगत कर्जत, मीरा-भाईंदर असे अनेक ठिकाणी चित्रीकरणासाठी स्टुडिओ निर्माण झाले आहेत. विखुरलेल्या स्वरूपात असलेल्या या चित्रपट उद्योगाला आधुनिक रूप देण्याचे काम येत्या काळात चित्रनगरीच्या माध्यमातून केले जाईल. चित्रपट क्षेत्रातील विखुरलेल्या घटकांसाठी सुविधा व कायापालटाद्वारे चित्रनगरीला आयकॉनिक स्वरूप देण्यासाठी पावले टाकली जात आहेत.

दर्जेदार मराठी चित्रपट आणि नाटके अभिनव निर्मितीमुळे सक्षम,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आशयघन व दर्जेदार मराठी चित्रपट आणि मराठी नाटके दर्शकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून त्यातील प्रयोगशिलता आणि अभिनव निर्मितीमुळे सक्षम ठरत आहे. मराठी चित्रपटाला सिनेमागृह न मिळण्याचा काळ मागे पडला असून आता एकाच वेळी दोन-दोन मराठी सिनेमे प्रदर्शित होतात आणि हाउसफुल होतात असे सांगून नटरंग, सखाराम बाईंडर यासह आताच्या दशावतार या चित्रपटांचा उल्लेख त्यांनी केला

भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी मुंबईत चित्रपट मुहूर्तमेढ रोवली. आज पर्यंत असंख्य हिंदी व मराठी चित्रपटांनी भावनाप्रधान कथानकातून प्रेक्षकांच्या मनामध्ये विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. सर्वसामान्य दर्शकांना जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचे काम केले आहे. आत्ताच्या पिढीस ( gen – z) भावणारे व आवडणारे चित्रपट देण्यासाठी प्रयत्न केले जावेत. यातून ते चित्रपटांशी जोडले जातील.”डिजिटल वॉरफेअर” मध्ये सहभागी होण्याचे चित्रपट उद्योगाला आवाहन

  माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात सायबर क्राईमच्या रूपाने आव्हान उभे राहत आहेत. शासन अशा गुन्हेगारी प्रकारांना आळा घालण्यासाठी यंत्रणांच्या कामकाजात आमूलाग्र बदल घडवत आहे. गैरप्रकार नियंत्रित करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा यंत्रणा कार्यान्वित केल्या जात आहेत. चित्रपट हे उत्कृष्ट समाजमाध्यम आहे, या बदलाचा साक्षीदार होऊन अशा विषयांवर आधारित कथा, सिनेमे निर्माण केले जावेत, यामधून या प्रयत्नांना बळ मिळेल. सायबर क्राईम, सेक्सटॉर्शन, सायबर फ्रॉड याबाबत जनसामान्यांना जागृत करणाऱ्या चित्रपटांतून हे घडू शकेल. यासाठी सायबर क्राईम विरोधात “डिजिटल वॉरफेअर” मध्ये सहभागी होण्याचे चित्रपट उद्योगाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवाहन केले.

यावेळी त्यांनी मुंबई शहरातील रस्ते विकास कामे, पोलीस दल, पायाभूत सुविधांची कामे, भुयारी मार्ग, मेट्रो, शहरातील वाहतूक व्यवस्था या अनुषंगाने प्रश्नांची उत्तरे देत, मुंबई शहरातील विकास कामे पूर्ण झाल्यानंतर 59 मिनिटात शहरातील एका ठिकाणावरून दुसऱ्या कोणत्याही ठिकाणावर जाता येईल, मुंबईकरांच्या प्रवास वेळेत बचत होईल, असे सांगितले.

या प्रकट मुलाखत प्रसंगी ‘ फिक्की’ चे अनंत गोयंका,’ मेटा’ च्या संध्या देवनाथन, आशिष कुलकर्णी, अर्जुन लोहार , दीपेंद्र सिंह कुशवाह उपस्थित होते. तसेच चित्रपट, प्रसार आणि समाज माध्यम क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते.

 

00000

संबंधित पोस्ट

जयभीमनगर प्रकरणी कारवाई न करणाऱ्या एसआयटीला न्यायालयात खेचून सरकारला घेराव घालणार- विशाल माने, अध्यक्ष युवा भीमसेना संघटना

vishwatmaklokswamivarta

स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ अभियानांतर्गत 34 हजाराहून अधिक नागरिकांची तपासणी**नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थिनींकरीता आरोग्यविषयक विशेष मार्गदर्शन सत्रे*

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी शहीदी समागम चित्ररथास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दाखविली हिरवी झेंडी..

vishwatmaklokswamivarta

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित शेतकऱ्याना मदत करण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य· मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील· अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी २,५४० कोटी ९० लाख ७९ हजार निधी वितरणास मान्यता

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू : मदत आणि उपचाराला मिळणार गती आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार…