vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महिला बचत गटांच्या महिलांचा मालमत्ताकर बिल वाटपास ‘हातभार’; ३० दिवसांतच विक्रमी बिल वाटप!तब्बल २१२ कोटींचे करसंकलन; ‘ऑनलाइन’ स्वरूपात कर भरण्यास करदात्यांची पसंती!बिल वाटप मोहिमेमध्ये तब्बल २०० महिलांचा सहभाग३० जूनपूर्वी कर भरून सवलत घेण्याचे आवाहन!

महिला बचत गटांच्या महिलांचा मालमत्ताकर बिल वाटपास ‘हातभार’; ३० दिवसांतच विक्रमी बिल वाटप!तब्बल २१२ कोटींचे करसंकलन; ‘ऑनलाइन’ स्वरूपात कर भरण्यास करदात्यांची पसंती!बिल वाटप मोहिमेमध्ये तब्बल २०० महिलांचा सहभाग३० जूनपूर्वी कर भरून सवलत घेण्याचे आवाहन!

नवी मुंबई प्रतिनिधी-

            नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ताकर विभागाने सन २०२५-२६ या विद्यमान आर्थिक वर्षामध्ये कर संकलन वाढीसाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध अभिनव उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेत आत्तापर्यंत २१२ कोटींचा कर संकलित केला आहे.

            महानगरपालिकेने यावर्षी आजतागायत २ लाख मालमत्ताधारकांना बिलांचे घरपोच वाटप केल्याने, मालमत्ताधारकांनी कर भरण्यासाठी पुढाकार घेऊन बिलावरील 30 जूनपर्यंत असलेल्या १० टक्क्यांच्या सवलतीचा लाभ घेतला आहे

            यावर्षी बचत गटांच्या महिलांद्वारे बिलांचे घरपोच वाटप, मोबाईल ॲप्लिकेशनच्या साहाय्याने मालमत्ताधारकांच्या माहितीचे संकलन व अद्ययावतीकरण (KYC), मालमत्ताकर भरण्यासाठी डिजिटल पद्धतीचा स्वीकार, मालमत्ताकराबाबत शंका निरसन व बिल मिळण्यासाठी व्हाट्सअप चॅटबॉट आणि मालमत्ताकरावर १० टक्क्यांची सवलत योजना अशा विविध प्रकारच्या अत्याधुनिक सेवा सुलभतेने उपलब्ध करून दिल्याने करदात्यांना कर भरण्यासाठी कोणतीही अडचण आलेली नाही.

            नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तब्बल साडेतीन लाखाहून अधिक मालमत्ता असून, मालमत्ताधारकांनी कर भरून १० टक्क्यांच्या सवलतीचा लाभ घेतला आहे. शहरातील मालमत्ताधारकांना पहिल्या तिमाहीमध्येच घरपोच बिल मिळाल्याने, तसेच मालमत्ताकर भरण्यासाठी डिजिटल पद्धतीला पसंती दिल्याने करसंकलनाला गती मिळाली आहे.बचत गटांच्या महिलांना मिळाला ‘रोजगार; मालमत्ताकर विभागाच्या पुढाकाराचा ‘दुहेरी’लाभ!  मालमत्ताकर विभागाने या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ताधारकांना बिलांचे वाटप करण्यासाठी अभिनव उपक्रम राबविला. बचत गटांच्या महिलांना मालमत्ता कराचे बिल वाटप तसेच मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे माहितीचे संकलन व अद्ययावतीकरण करण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या कामासाठी त्यांना प्रतिबिलासाठी योग्य मानधन दिल्याने महिलांना बिल वाटपातून रोजगार निर्माण होऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी विभागाने दिली. यातूनच बिलांचे शंभर टक्के वाटप शक्य झाले. त्याचबरोबर, या अभिनव उपक्रमामुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षी फक्त ३० दिवसांतच निम्म्याहून अधिक मालमत्तांपर्यंत बिले पोहोचल्याने, कमी कालावधीत तब्बल २१२ कोटींचा कर संकलित करण्यात आला आहे.

———-एका क्लिकवर मालमत्तेबाबत ‘एसएमएस’ द्वारे माहिती – @NMMC वरून येणा-या एसएमएसवरील लिंक उघडावी!  महानगरपालिकेने यावर्षी संकलित केलेल्या माहितीच्या आधारे मालमत्ता धारकांना ‘एसएमएस’द्वारे कर भरण्याचे आवाहन करण्यात आले, ज्यास मालमत्ताधारकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महानगरपालिकेने यावर्षी मालमत्ता धारकांची माहिती संकलन व अद्ययावतीकरण (KYC) केल्याने, आता मालमत्ता धारकांना त्यांच्या नोंदणीकृत क्रमांकावर मालमत्तेबाबतची माहिती मिळणार आहे. नागरिकांना महानगरपालिकेच्या ‘@NMMC’ या हॅण्डलवरून येणाऱ्या एसएमएसवरीलच लिंक उघडावी, असे आवाहन मालमत्ताकर विभागाकडून करण्यात आले आहे. त्याबरोबरच, ज्या मालमत्ताधारकांनी अद्यापही आपला मोबाईल क्रमांक नोंदणीकृत केला नाही, अशा मालमत्ताधारकांनी तात्काळ नोंदणी करावी, असे आवाहनही विभागाने केले आहे.

———प्रभावी जनजागृतीला मालमत्ताधारकांचा सकारात्मक प्रतिसाद!    या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ताकर भरण्यासाठी डिजिटल प्रक्रियेची उपलब्धता सोशल मीडिया व इतर माध्यमांतून करदात्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आली. यामध्ये होर्डिंग्ज, डिजिटल बोर्ड, जाहिराती, तसेच शहरातील प्रत्येक सिग्नलवर आवाहनपर जिंगल्स यांचा समावेश होता. यामुळे मालमत्ताधारकांपर्यंत १० टक्क्यांच्या सवलतीची माहिती पोहोचवून जागरूकता निर्माण करण्यामध्ये महत्त्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला. या जनजागृतीस मालमत्ता धारकांनी कर भरून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.————ऑनलाइन बिल उपलब्धतेसाठी वापरा महानगरपालिकेचा व्हाट्सअप ‘चॅटबॉट’!  ऑनलाइन स्वरूपात बिल उपलब्ध करण्यासाठी महानगरपालिकेने व्हॉट्सअप ‘चॅटबॉट’ सुरू केला आहे. मालमत्ताधारकांनी *८२९१९२०५०४* या क्रमांकावर इंग्रजीमध्ये ‘Hi’ असा संदेश पाठवून, फक्त चार सोप्या पायऱ्यांमध्ये माहिती भरल्यास त्यांना आपले बिल मिळते. त्यामुळे तात्काळ मालमत्ताकराचा भरणा करून सवलतीचा लाभ घेता येतो. त्याचाही लाभ मोठ्या प्रमाणात घ्यावा, असे आवाहन मालमत्ताकर विभागाकडून करण्यात आले आहे.

———–करदात्यांनी ३० जूनपूर्वी कराचा भरणा करून १० टक्क्यांच्या सवलतीचा लाभ घ्यावा!      नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच नागरिकांना उत्तम सोयी-सुविधा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहे. नागरिकांना मालमत्ताकर देयक प्राप्त करून घेणे व त्याचा भरणा करणे सुलभ जावे याकरिता विभागामार्फत राबविण्यात आलेले विविध उपक्रम तसेच ऑनलाईन पेमेंटचे वेबसाईट, पोर्टल, डेबिट कार्ड, क्रेजिट कार्ड, जीपे – फोन पे – पेटीएम असे एका क्लिकवर पेमेंट करण्याचे अनेक यूपीआय पर्याय याच लोकाभिमुख कार्यप्रणालीचा एक महत्वाचा भाग आहेत. यामध्ये महिला बचत गटांच्या सहभागातून झालेले बिल वाटप असो तसेच मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे होत असलेले माहिती संकलन, यातून आपण एक पारदर्शक आणि नागरिकाभिमुख प्रणाली तयार करत आहोत. तसेच, ऑनलाईन कर भरणाऱ्यांना देण्यात आलेली १०% सवलत आणि व्हॉट्सअॅप चॅटबॉटसारख्या सुविधांमुळे करदात्यांना अत्यंत सोयीस्कर पद्धतीने आपले कर्तव्य पार पाडता येणार आहे. या डिजिटल उपक्रमांचा करसंकलनावर सकारात्मक परिणाम दिसत असून, याचा फायदा शेवटी शहराच्या विकासासाठीच होणार आहे. तरी सर्व करदात्यांनी या सवलतीचा आणि सुविधांचा लाभ घेऊन वेळेत मालमत्ताकराचा भरणा करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

नागरी संरक्षण दलामार्फत टिटवाळा (पूर्व) येथे मॉक ड्रीलचे आयोजन

कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर सज्जतेचे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश -त्यानुसार महानगरपालिकेच्या तिन्ही रूग्णालयात राखीव बेड्सची व्यवस्था…

सन 2024-25 “विभागीय हातमाग कापड स्पर्धा” चे आयोजन

स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत नवी मुंबईतील धार्मिक स्थळांची विशेष स्वच्छता मोहीम..

vishwatmaklokswamivarta

बालकांच्या काळजीसाठी जिल्हास्तरीय समिती सदस्य होण्यासाठी पात्र व्यक्तींनी अर्ज सादर करावेत

vishwatmaklokswamivarta