vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे समता दिंडी, व्याख्यान, रॅली उत्साहात साजरी*

*राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे समता दिंडी, व्याख्यान, रॅली उत्साहात साजरी*

 

सातारा प्रतिनिधी- सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून आज श्रीमंत प्रतापसिंह महाराज हायस्कूल, राजवाडा, सातारा येथे थोर पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करुन संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव, सातारा यांनी समता दिंडीस हिरवा झेंडा दाखवून रिमझिमत्या पावसात उत्सफूर्तपणे समता दिंडीस सुरुवात करण्यात आली. समता दिंडीचा समारोप नगर परिषद चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा परिसर या ठिकाणी करण्यात आला. समता दिडीमध्ये साता-यातील श्रीमंत प्रतापसिंह महाराज हायस्कूल, कन्याशाळा तसेच शासकीय वसतिगृहामधील मुले मुली सहभागी होते. समता दिंडीच्या समारोप प्रसंगी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करुन उपस्थित सर्व विद्याध्यर्थ्यांना अल्पोपहार वाटप करण्यात आला.

दरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक भवन येथे आयोजित केलेल्या मुख्य कार्यक्रमाध्ये सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमामध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेते व इयत्ता 10 वी च्या विभागीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र, संविधानाची प्रास्ताविका व गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. तसेच राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन चरित्र व समाजकार्य या विषयावर प्राध्यापक निरंजन फरांदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शाहू महाराजांनी समाजातील सर्व घटकासाठी केलेले कार्य आजच्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल असे विचार व्याख्यानाच्या माध्यमातून प्राध्यापक फरांदे यांनी व्यक्त केले.

यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ. कांचन जगताप, शाहू फुले आंबेडकर प्रबोधन मंचाचे प्रा. केशव पवार, चित्रकार श्री. सतिश गायकवाड, प्रा. डॉ. प्रदिप शिंदे, समाजभूषण पुरस्कार्थी शाहीर तुकाराम कांबळे, शासकीय वसतिगृहाचे अधिक्षक व सामाजिक न्याय भवन या परिसरात कार्यरत असलेल्या कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,

००

संबंधित पोस्ट

शबरी नॅचरल्स’चा डंका आता दिल्लीपर्यंत; केंद्रीय जनजातीय संचालक डॉ. वर्नाली डेका यांच्याकडून कौतुकाची थाप

इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेतल्या निदर्शनांप्रकरणी भारतीय युवा काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब अटकेत.

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते प्रशासकीय विषयांवरील पुस्तकांचे प्रकाशन…

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘वाचन कट्ट्या’ला भेट अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल जिल्हाधिकारी स्वामी यांचे केले कौतुक

नूतन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी कार्यभार स्वीकारला

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस