vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नूतन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी कार्यभार स्वीकारला

नूतन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी कार्यभार स्वीकारला

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : नूतन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला. सेवानिवृत्त होत असलेले विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडून त्यांनी पदभार स्विकारला.जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर आयुक्त अनंत गव्हाणे, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी यांनी श्री पापळकर यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.यावेळी नगरविकास विभागाचे सहआयुक्त देविदास टेकाळे यांच्यासह प्रादेशिक विभागप्रमुख उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री पापळकर यांनी विभाग प्रमुखांशी संवाद साधत विभागातील माहिती जाणून घेतली. नवनियुक्त विभागीय आयुक्त श्री. पापळकर हे २०१० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला जिल्हाधिकारी, हिंगोली जिल्हाधिकारी, धुळे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

******

संबंधित पोस्ट

मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून माध्यम नियंत्रण कक्षाची व निवडणूक तक्रार निवारण कक्षाची पाहणी …

आजपासून पासून नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला सुरूवात

दिवंगत नरेंद्र लांजेवार यांनी घालून दिला प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा परिपाठ” – डॉ सुकेश झंवर

vishwatmaklokswamivarta

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

बचत गटांच्या उत्पादनांना वर्षभर विक्रीची संधी मिळावी- प्रतापराव जाधव• जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचा केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन• बुलडाण्यात विक्री, प्रदर्शन 9 मार्चपर्यंत