vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

श्री गणेशा आरोग्याचा; उपक्रमात २० हजार जणांची आरोग्य तपासणी..

श्री गणेशा आरोग्याचा; उपक्रमात २० हजार जणांची आरोग्य तपासणी..

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष व विविध आरोग्य संस्थांच्या सहकार्याने दि.२७ ऑगस्ट ते दि.५ सप्टेंबर या कालावधीत ‘श्री गणेशाआरोग्याचा’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात २४६ शिबीरांत २० हजार लोकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

 त्यात ६९६४ पुरुष, ७७२२ महिला, तसेच ५३६४ बालके यांची तपासणी करण्यात आली. पैकी ४२२ जणांचे ईसीजी व ७२१४ जणांच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या. तसेच तपासणी साठी आलेल्या व्यक्तिंची आयुष्मान भारत कार्डची नोंदणी ही करण्यात आली. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाशी संलग्न रुग्णालये, महात्मा जोतिब फुले जनआरोग्य योजनेशी संलग्न रुग्णालये, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे यांच्या माध्यमातून या शिबिरांचे आयोजन केले गेले. जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवला. गणेश दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत रक्तदाब, रक्तातील साखर, इ सी जी, रक्त तपासणी,नेत्र तपासणी, दंत तपासणी इत्यादी तपासण्या केल्या. त्याचबरोबर मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, यांसारख्या दुर्धर आजारांवरील योग्य ते मार्गदर्शन व उपचार करून देण्याकरिता मुख्यमंत्री सहायता निधी व इतर शासकीय योजनांमार्फत कशाप्रकारे सहाय्य मिळेल याबाबतचे प्रबोधन शिबिरांमध्ये करण्यात आले. या उपक्रमासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर, डॉ.कमलाकर मुदखेडकर,जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विशाल बेंद्रे यांनी सहकार्य केले.

०००००

संबंधित पोस्ट

मिरजचे शासकीय उपचार केंद्र बजावणार व्यसनमुक्ती चळवळीत मोलाची भूमिका

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

समाजकारणाच्या मजबुतीसाठी राजकारण महत्त्वाचे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मित्र परिवारातर्फे भावपूर्ण सत्कार,वेगळ्या विदर्भाला पाठिंबा असल्याचे केंद्रीयराज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे मत*  

नीट (युजी) 2026 प्रवेश परिक्षार्थीची होणार वैद्यकीय तपासणी

🎖️ ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते मागांती मुरली मोहन यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी 8 एप्रिल रोजी लॉटरी