vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

16 सप्टेंबर रोजी जालना येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

16 सप्टेंबर रोजी जालना येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

            जालना, प्रतिनिधी:- जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने तसेच रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. तरी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जालना येथे मंगळवार दि. 16 सप्टेंबर, 2025 रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह -जागेवर निवड संधीचे आयोजन सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात आले आहे.

पेटीएम सव्हिसेस प्रा.लि. जालनाचे सेल्स प्रतिनिधी पदासाठी बारावी, पदवी उत्तीर्णसाठी 25 पदे, त्याच प्रमाणे भारत फायनन्स प्रा.लि. जालना यांचे फिल्ड प्रतिनिधी, शाखा व्यवस्थापक आणि सहाय्यक शाखा व्यवस्थापक पदासाठी दहावी, बारावी पास, उत्तीर्णसाठी 66 पदे अशी एकूण 91 रिक्त पदे प्राप्त झालेली आहेत. नोकरी इच्छुक पात्रता धारक उपस्थित होणाऱ्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध आहे. जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या एन.सी.एस. पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी देखील www.ncs.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेजवरील जॉब सिकर लॉगिन मधून आपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅसबोर्डमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून जालना जिल्हा निवडून त्यातील प्लेसमेंट ड्राईव्ह 04 याची निवड करावी. किमान दोन प्रतीत बायोडाटासह फोटो, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आदि कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवून मंगळवार दि. 16 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 11 ते दु. 2 या वेळेत प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकतामार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय जालना 431203 येथे उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या पर्वणीचा निश्चित लाभ घ्यावा. असे सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना यांनी प्रसिध्दीपकाद्वारे कळविले आहे.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध

पोलीस दलाने व्हिडिओ पार्लर, कॅसिनोंची तपासणी करावी -पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अमली पदार्थ टास्क फोर्सच्या सहाव्या बैठक..

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांचा जिल्हा दौरा…

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकल व शालेय साहित्याचे वितरण.

शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- उपमुख्यमंत्री अजित पवार ‘इंदापूर कृषी महोत्सव २०२५’ चा समारोप

vishwatmaklokswamivarta

भारतीय रेल्वेने प्रवासी सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार..