vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गडचिरोलीतील बंगाली बांधवांना मिळणार जमिनीचा मालकी हक्क – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ४० हजार बंगाली नागरिकांना मोठा दिलासा

गडचिरोलीतील बंगाली बांधवांना मिळणार जमिनीचा मालकी हक्क – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे-४० हजार बंगाली नागरिकांना मोठा दिलासा..

मुंबई, प्रतिनिधी  : गडचिरोली जिल्ह्यातील बंगाली समाजातील व्यक्तींना पुनर्वसन कायद्यांतर्गत मिळालेल्या जमिनींचा वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला असून या बांधवांना मिळालेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-२ मधून वर्ग-१ (पूर्ण मालकी हक्क) करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.

विधानभवनात आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत महसूलमंत्र्यांनी यासंबंधीचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले.

 

शासनाच्या या धोरणात्मक निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील एकूण २१ हजार ८२४ एकर जमिनीचा प्रश्न कायमचा सुटणार असून, ४० हजार बंगाली बांधवांना याचा थेट फायदा होणार आहे. यामुळे बंगाली समाजाला त्यांच्या हक्काच्या जमिनीवर आता हक्काची मालकी मिळणार आहे.१० हजार घरांचे नियमितीकरण; गावठाणे होणार पूर्णपणे मोफत

जिल्ह्यातील बंगाली समाजाची सुमारे १० हजार घरे नियमित करण्यासाठी तातडीने अधिकृत प्रस्ताव पाठवण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. विशेष म्हणजे, ही सर्व संबंधित गावठाणे पूर्णपणे विनाशुल्क करून देण्यात येणार आहेत, ज्यामुळे दुर्गम भागातील हजारो गरीब कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा लाभला आहे

८ हजार रुपये प्रति एकर दराने शेतजमीन होणार नियमितया पुनर्वसन क्षेत्रातील १२०० एकर शेतजमीन तातडीने नियमित करण्याची प्रक्रिया सध्या राबवली जात आहे. रेडिरेकनरच्या २५ टक्के दराप्रमाणे शेतजमिनीसाठी प्रति एकर ८ हजार रुपये भरण्याची तयारी बंगाली समाजातील नागरिकांनी स्वतःहून दर्शवली आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा कायदेशीर आणि तांत्रिक प्रस्ताव विनाविलंब शासनाकडे सादर करण्याचे निर्देश मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित जिल्हा प्रशासनाला व महसूल अधिकाऱ्यांना दिले आहेत.

 

४० हजार नागरिकांच्या आयुष्यात नवी पहाट

पुनर्वसन कायद्यांतर्गत मिळालेल्या जमिनींना ‘वर्ग-२’ चा दर्जा असल्यामुळे बंगाली समाजाला जमिनीची खरेदी-विक्री, बँक कर्ज किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने झालेल्या या निर्णयामुळे आता ४० हजार नागरिकांच्या अडचणी दूर झाल्या आहेत. प्रशासनाने हा प्रस्ताव युद्धपातळीवर तयार करून अंतिम मंजुरीसाठी पाठविण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

००००

संबंधित पोस्ट

जिल्हा व सत्र न्यायालय येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

निवडणूक आयोगाकडून वकील व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

जिल्हा रुग्णालयात #हृदयरोग निदान व #आरोग्यशिबीर संपन्न शिबिरात 181 बालकांची तपासणी तर 75 पात्र बालकांवर किम्स हॉस्पिटल ठाणे येथे लवकरच मोफत हृदय शस्त्रक्रिया                                                                                  

vishwatmaklokswamivarta

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाल्याच्या निषेधार्थ प्रकरण जलद न्यायालयात चालविणे सर्व दोषींवर कारवाई  हत्त्या करणाऱ्यांना तात्काळ फाशी देण्यात यावी, अशी मागणी मोर्चाच्यावतीने करण्यात आली

vishwatmaklokswamivarta

विविध कल्याणकारी उपक्रम, योजनांवर राष्ट्रीय पोस्टर डिझाईन स्पर्धा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta

श्री अंबाबाई मंदिर परिसर व कॉरिडॉर’ विकासासाठी १५०० कोटींचा निधी – केंद्रीय मंत्री अमित शाह

vishwatmaklokswamivarta