vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई शहर जिल्ह्यात सेवा पंधरवड्याचा शुभारंभ

मुंबई शहर जिल्ह्यात सेवा पंधरवड्याचा शुभारंभ.

मुंबई, प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दि. १७ सप्टेंबर २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या सेवा पंधरवड्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या उपस्थितीत कुलाबा विधानसभा निवडणूक मध्यवर्ती कार्यालय येथे झाला.

या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी उपस्थित नागरिकांना महाऑनलाईन पोर्टलद्वारे प्रमाणपत्राकरिता अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले. या विशेष शिबिरामध्ये नागरिकांकडून आधार विषयक सेवा, विविध दाखल्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले तसेच काही लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

नागरिकांनी शासनाच्या अधिकृत वेबसाईट, फेसबुक पेज, अधिकृत चॅनेलला फॉलो करून शासनाच्या सेवांबाबत माहिती घेण्याचे तसेच सेवा पंधरवड्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवून शासनाच्या विविध सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले

कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, तहसिलदार संदीप आवारी, तहसिलदार अश्विनकुमार पोतदार, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते.

०००

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय लोकअदालत मध्ये 1817 वादपूर्व प्रकरणे निकालीएकूण वीस कोटी अडोतीस लाख दहा हजार पाचशे तेहतीस रुपयांची वसुली..

vishwatmaklokswamivarta

डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी स्वीकारला बुलढाणा जिल्हाधिकारी पदाचा पदभार

गरीब आणि मध्यमवर्गीयांना आरामदायी आणि उत्तम प्रवासाचा अनुभव देण्याला रेल्वेचे सर्वोच्च प्राधान्य : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

महाराष्ट्रातील कारागृह ग्रंथालयांसाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्याकडून बुककेस आणि बुकरॅक देण्याचा निर्णय कारागृहातील वाचनसंस्कृतीस चालना; बंदिवानांसाठी वाचनाची नवी संधी

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन आज होणार साजरा, मुंबईत शिवाजी पार्क इथं राज्यपालांच्या हस्ते आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता होणार ध्वजवंदन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस