vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

रोजगार मेळाव्यात १२८ तरुणांचा सहभाग; ३८ जणांची प्राथमिक निवड

रोजगार मेळाव्यात १२८ तरुणांचा सहभाग; ३८ जणांची प्राथमिक निवड

    अमरावती, प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ ला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अमरावती शहर आणि परिसरातील विविध तालुक्यांमधून तब्बल १२८ उमेदवारांनी मेळाव्यात सहभाग घेतला.

    या मेळाव्यात दहावी, बारावी, पदविकाधारक, पदवीधर तसेच तांत्रिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार संधी मिळावी यासाठी पाच नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यामध्ये कोल्ब्रो ग्रुप, सहयोग मल्टी बँक, कोअर प्रोजेक्ट, स्विगी आणि जाधव गियर्स या कंपन्यांचा समावेश होता. या कंपन्यांनी ८२ विविध पदांसाठी मुलाखती घेतल्या.

 उपस्थित १२५ उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन जागेवरच निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यातून ३८ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून, ४ उमेदवारांची अंतिम निवड लगेचच जाहीर करण्यात आली. त्यामुळे तरुणांना कंपन्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली.

    या मेळाव्याच्या यशामुळे जिल्ह्यातील तरुणांना आत्मनिर्भर होण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे, असे मत कौशल्य विकास केंद्राचे अधिकारी अभिषेक ठाकरे यांनी व्यक्त केले.

     कार्यक्रमाचे संचालन श्रीमती वैष्णवी कुयरे यांनी तर क्रपा अरगुर्लेवार यांनी आभार मानले.

**

संबंधित पोस्ट

सिपेटच्या विविध अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात..

vishwatmaklokswamivarta

आई’ पर्यटन धोरणाद्वारे महिलांना पर्यटन व्यवसायात नवी दिशा

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभासाठी प्रवेश अर्ज 26 ऑक्टोबरपर्यंत करण्याची मुदत..

vishwatmaklokswamivarta

हिवारा शाखा कार्यालयात डाक चौपाल कार्यक्रम संपन्न

राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा येथेशिकाऊ उमेदवारांची भरतीØ पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी (ER 1) माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी…

vishwatmaklokswamivarta