vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी (ER 1) माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी…

शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी (ER 1) माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी…

 

रायगड(जिमाका)दि.02:- जिल्ह्यातील शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये‍ (रिक्तपदे अधिसूचित करणे सक्तीचे) कायदा, 1959 वनियम 1960 च्याकलम 5(1) अन्वये सार्वजनिक क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापना तसेच कलम 4(2) अन्वये खाजगी क्षेत्रांतील कायद्यांतर्गत असणाऱ्या सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या मनुष्यबळाची (पुरुष-स्त्री) दर तिमाही (मार्च/जून/सप्टेंबर/डिसेंबर) अखेरची माहिती महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार रायगड-अलिबाग यांनी केले आहे.

 

त्यानुषंगाने आपल्या आस्थापनेची माहे जून 2025 अखेर संपणाऱ्या एप्रिल 2025 ते जून 2025 या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक विवरणपत्र आस्थापनांनी या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर Employment या टॅबवरील Employer (List a Job) याला क्लीक करुन आपल्या आस्थापनेचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरुन लॉगिन करावे लॉगिन झाल्यावर आपल्या आस्थापनेची माहिती अद्ययावत करुन ER-1 वर क्लिक करावे Enter ER-1 याद्वारेú आपल्याकडील अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी. हे त्रैमासिक विवरणपत्र सादर करण्याचा कालावधी दि.1 ते 30 जुलै 2025 आहे, याची सर्व शासकीय व खाजगी आस्थापनांनी नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे प्रत्येक आस्थापनेने आपल्या आस्थापनेचा नोंदणी तपशील (Employer Profile) देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अद्यावत करावी, या संदर्भात कोणत्याही स्वरुपाचे सहकार्य अथवा युजर आयडी/पासवर्ड याबाबत माहिती आवश्यक असल्यास या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर -02141-222029 अथवा या कार्यालयाचे लिपिक-टंकलेखक श्री. म.भा. वखरे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9421613757 वर संपर्क साधल्यास आपणास या कार्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.00000

संबंधित पोस्ट

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेसाठी अर्ज करावेत

हवलदार कायम स्वरूपी सुरक्षा रक्षक पदाकरीता-इच्छूक माजी सैनिक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात नाफेडतर्फे चना खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरु

स्टार्टअप्स, बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील-उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र दालनाचे थाटात उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बुधवारी (दि.११) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

vishwatmaklokswamivarta

गुंतवणूकदारांनी राज्याच्या जहाज बांधणी उद्योगाच्या विकासात योगदान द्यावे- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे जागतिक बंदरे आणि जहाज परिषदेत महाराष्ट्राच्या सागरी विकासाची दिशा

vishwatmaklokswamivarta