vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

एच आय व्ही आणि इतर शारीरिकरित्या पसरणा-या आजारांविषयी जनजागृती कार्यक्रम’ संपन्न

एच आय व्ही आणि इतर शारीरिकरित्या पसरणा-या आजारांविषयी जनजागृती कार्यक्रम’ संपन्न

 सातारा प्रतिनिधी. मा.प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष श्री. ए.एम. शेटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांचे मार्गदर्शनानुसार व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशान्वये क्रांतिसिंह नाना पाटील सिव्हिल हॉस्पीटल, सातारा यांचे संयुक्त विद्यमाने दि. २४/ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता, सिव्हिल हॉस्पीटल, सातारा येथे आयोजित करणेत आला होता. सदर कार्यक्रमामध्ये मा. निना नि. बेदरकर, सक्रिय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा, डॉ. सलमा इनामदार, प्रभारी अतिरिक्त जिल्हा चिकित्सक, सातारा, डॉ. पुनम लाहोटी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, सातारा, डॉ. गीता गुजर, वैद्यकीय अधिकारी, डॉ. शिंदे मॅडम, आयुष अधिकारी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये श्री. पुंडलिक पाटील, जिल्हा समन्ययक जिल्हा रुग्णालय, सातारा यांनी सूत्रसंचालन केले. मा. नीना बेदरकर, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांनी विधी सेवा नालसा मालसा योजना याविषयी माहिती सांगितली डॉ गीता गुजर, वैद्यकीय अधिकारी यांनी एच आय व्ही आणि इतर शारीरिकरित्या पसरणा-या आजारांविषयी सखोल मार्गदर्शन केले. श्रीमती माधुरी बाबर यांनी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले.

संबंधित पोस्ट

इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या नवीन कार्यालयाचे आज उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

आफ्रिकेच्या काही भागांमध्ये अलीकडेच झालेल्या प्रादुर्भावांच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय इबोला विषाणू रोगाच्या बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

vishwatmaklokswamivarta

बालमृत्यू कमी करण्यासाठी ‘स्टॉप डायरिया’ अभियानाला जिल्ह्यात सुरुवात

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे“कर्करोग तपासणी वाहन लोकार्पण सोहळा”

vishwatmaklokswamivarta

राज्यात ५ हजार ४९७ रुग्णांची नोंद; प्रत्येक जिल्ह्यात डे-केअर सेंटर कार्यान्वित

कुष्ठरुग्ण शोध मोहिमेमध्ये सातारा जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर