vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

प्राथमिक शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी;परिस्थितीचे भान राखणाऱ्या शिक्षकांचेशालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून कौतुक

प्राथमिक शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी;परिस्थितीचे भान राखणाऱ्या शिक्षकांचेशालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून कौतुक

मुंबई, प्रतिनिधी : राज्यात मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना शासनामार्फत सर्वतोपरी साहाय्य केले जात आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खारीचा वाटा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी एक दिवसाचे वेतन देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे कळविले आहे. राज्यातील पूर परिस्थितीचे भान राखून मदतीचा निर्णय घेणाऱ्या सर्व शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी कौतुक करुन आभार मानले.

   महाराष्ट्रातील अनेक भागात मोठा पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. या परिस्थितीची पाहणी करुन पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील सर्वच मंत्री विविध जिल्ह्यात जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करुन पूरग्रस्तांना दिलासा देत आहेत. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी हिंगोली जिल्ह्यात परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करुन नागरिकांना दिलासा दिला आहे.

या परिस्थितीचे भान राखून स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याबाबतचे पत्र महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव आणि सरचिटणीस राजेश सुर्वे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 14 जून रोजी; जालन्यातील 17 परीक्षा  केंद्रांच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश..

सर्व विभागांनी समन्वय ठेवून उद्दिष्टपूर्ती करावी – डॉ. निधी पांडे-कृषी संलग्न विभागांचा सविस्तर आढावा ; कृषी विभागाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त

दिल्लीतील ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्य16 ऑगस्टपासून गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्रीदिल्लीतील ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये16 ऑगस्टपासून गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्री..

मध्यवर्ती बसस्थानक, जुना रेणापूर नाका बसस्थानकावरून २३ जून पासून सुटणाऱ्या बस फेऱ्यांचे नियोजन जाहीर.

3500 हून अधिक श्रीसदस्य व नागरिकांच्या सहभागातून सायन पनवेल महामार्ग व रेल्वे स्टेशन सखोल स्वच्छता मोहीम यशस्वी

vishwatmaklokswamivarta

सोमनाथ मंदिर भारताच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा सोमनाथ स्वाभिमान पर्व – अतूट आस्थेचे १००० वर्षी” या विशेष  कार्यक्रमाचे आयोजन