vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षाआता 28 सप्टेंबर ऐवजी 9 नोव्हेंबरला- प्रशिक्षण वर्ग पुढे ढकलले

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षाआता 28 सप्टेंबर ऐवजी 9 नोव्हेंबरला- प्रशिक्षण वर्ग पुढे ढकलले

        सांगली, प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजीच्या शुध्दीपत्रकानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025, दिनांक 28 सप्टेंबर 2025 ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दि. 9 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शनिवार, दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी या परीक्षेसाठी आयोजित करण्यात आलेले प्रशिक्षण वर्ग पुढे ढकलण्यात आले आहेत. प्रशिक्षणाचे सुधारीत वेळापत्रक स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. कार्यालय प्रमुख यांनी ही बाब परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे जिल्हा केंद्रप्रमुख महाराष्ट्र लोकसेवा आयोग तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत दि.8 ते 21 एप्रिल 2026 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी जारी केले

पाकिस्तानच्या वाढत्या तणावात- केंद्रीय गृह मंत्रालयाने उद्या संपूर्ण देशात देशव्यापी सुरक्षा मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत

आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना,इच्छुकांनी योजनेच्या अधिक माहितीकरीता संपर्क साधावा

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना  उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

खाणीतील कामगारांच्या मुला-मुलींना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अनुदान

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत 94 प्रकरणे पात्र…

vishwatmaklokswamivarta