vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती मिळणार, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको; बँकाना मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती मिळणार, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको; बँकाना मुख्यमंत्र्यांचे निर्देश..

मुंबई, प्रतिनिधी: राज्य शासन पूरग्रस्ताच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. शेतकरी, आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावी, असे निर्देश बँकाना दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतकरी वर्ग सध्या अडचणीत आहे. हे लक्षात घेऊन बँकांना वसुली थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पूरग्रस्त कुटुंबांना गहू-तांदूळ, डाळी व आवश्यक वस्तूंचा संच वितरित करण्यात येत आहे. विहीर खचणे, शेतजमीन खरडून जाणे, यावर केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊन, झालेल्या नुकसानीवरही राज्य शासन स्वतंत्र मदत करणार आहे. नुकसानीचे पंचनामे येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण होऊन पुढील आठवड्यात केंद्र शासनाला प्रस्ताव पाठविला जाणार आहे. मात्र, केंद्र शासनाच्या मदतीची वाट न पाहता राज्य शासनाच्या स्वतःच्या निधीतून मदत सुरू केली आहे. केंद्राकडून ती रक्कम ‘रिइम्बर्समेंट’च्या स्वरूपात मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असली तरी आपत्ती व्यवस्थापन नियमावलीत अशी व्याख्येचा समावेश नाही. असे असले तरी टंचाई निवारण काळातील निकषांप्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

0000

संबंधित पोस्ट

नंदुरबार जिल्ह्यात सर्व वाडी, पाडे व गावांना-पारंपरिक पद्धतीने वीज पुरवठा करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक_*मुंबईत प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !हिंदूंना आपली निर्णायक लढाई स्वत:च लढावी लागेल !* – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती

नवरात्राच्या उपवासाचे महत्त्व काय ?  व्रताचे नियम

vishwatmaklokswamivarta

व्ही बी जी-राम-जी च्या माध्यमातून ग्रामपंचायतींनी विकास साधावा – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार- समडोळीत व्ही बी ‘जी-राम-जी’ जनजागृतीसाठी विशेष ग्रामसभा उत्साहात

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक शाळेत मराठी शिकविणे बंधनकारक – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे शिक्षण विभाग आढावा बैठकीत पिंक शाळा, शिष्यवृत्ती, शिक्षक समायोजन आदी विषयांवर सखोल चर्चा