vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आव्हानांवर मात करूया, आपत्तीग्रस्त बांधवांना नव्या उमेदीने उभे करुया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस**विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देताना निर्धार*

*आव्हानांवर मात करूया, आपत्तीग्रस्त बांधवांना नव्या उमेदीने उभे करुया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस**विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देताना निर्धार*

 

मुंबई, प्रतिनिधी – विजयादशमीच्या सणाकडून प्रेरणा घेऊन आव्हानांवर, संकटावर मात करण्याची हिंमत बाळगुया, असे आवाहन करतानाच, विजयादशमीचे हे पर्व राज्यातील नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्री श्री. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्याही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन यांच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शुभेच्छा देतानाच, राज्यात पावसामुळे अनेक भागात अभूतपुर्व बिकट परिस्थिती उद्भवली आहे. या संकटसमयी आपण सगळे एकजुटीने या आपत्तीग्रस्त नागरिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहूया. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वतोपरी योगदान देऊया. या बांधवांना पुन्हा नव्याने उमेदीने करण्याचा निर्धार करूया, असे आवाहन केले आहे.

‘विजयादशमीचा सण हा असत्यावर सत्याचा विजयाचा संदेश घेऊन येतो. या सणाकडून सकारात्मक अशी ऊर्जा घेऊया. बिकट परिस्थितीवर मात करून, अडचणीतून मार्ग काढण्यात महाराष्ट्र नेहमीच पुढे राहीला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ते अनेक अग्रणींनी आपल्याला हाच वारसा-वसा दिला आहे. ही प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी सज्ज होऊया. आपल्या सर्वांच्या एकजूटीतून महाराष्ट्र विकासाची पताका डौलाने फडकत ठेवण्यासाठी निर्धार करूया, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संदेशात म्हटले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र प्रवर्तनातून विश्वाला सामाजिक समतेची दिशा दिली. हा दिवस अखंड विश्वासाठी चिरंतन प्रेरणादायी ठरो, अशी मनोकामनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस व्यक्त केली आहे.

संबंधित पोस्ट

केईएम रुग्णालयात अत्याधुनिक ‘व्हेसल सीलर’ उपकरणांची उपलब्धता; गरीब रुग्णांना शस्त्रक्रियेत दिलासा मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक आरोग्य सेवेला बळ; शस्त्रक्रियांची अचूकता आणि सुरक्षितता वाढणार

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. अनेक ठिकाणी अचानक पुराचा लोंढा वस्तीत घुसल्यानं घरं दुकानं तसंच वाहनांचंही नुकसान झालं. 

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकला जोडणाऱ्या महामार्गाबाबत बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्प’चे अनावरण संपन्न

कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठीआता शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य…

महिला व बालविकास मंत्रालयाकडून ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’साठी अर्ज आमंत्रितअर्ज स्वीकारण्यास 1 एप्रिल 2025 पासून सुरुवात, अंतिम मुदत 31 जुलै 2025

vishwatmaklokswamivarta