vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

निवडक टॉप क्लास शाळांमध्ये शिकण्यासाठी लागणारा शैक्षणिक खर्च मिळणार शासकीय योजनेतून…

निवडक टॉप क्लास शाळांमध्ये शिकण्यासाठी लागणारा शैक्षणिक खर्च मिळणार शासकीय योजनेतून…

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- केंद्र शासनाच्या Top Class Education in School for OBC,EBC & DNT Students”under PM YASASVI- reg EG. या योजनेकरिता ईबीसी ,डीएनटी प्रवार्गार्तील इयत्ता 9 वी ते 12 वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थांनी https://scholarships.gov.in/ या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी निवडक टॉप क्लास शाळांमध्ये शिकण्यासाठी लागणारा शैक्षणिक खर्च शासकीय योजनेतून मिळणार असल्याची माहिती सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, रायगड सुनिल जाधव यांनी दिली आहे.

   याकरिता पात्रता पुढीलप्रमाणे :-लाभार्थी: ओबीसी, ईबीसी, डीएनट्टी प्रवर्गातील विद्यार्थी, वार्षिक कुटुंबीय उत्पन्नः कमाल 2 लाख 50 हजार असावे, निवड पद्धतः मागील वर्गातील गुणांच्या आधारे मेरिट यादी, आरक्षण: किमान 30% जागा मुलींसाठी राखीव, शाळा निवडः सलग वर्षांमध्ये 100 % निकाल देणाऱ्या रायगडजिल्ह्यातील सर्वोत्तम शाळांचीनिवडकेलीली यादी मिळविण्यासाठी सोबतचा QR code स्कॅन करून घेणे.वर्गनिहाय आर्थिक मदत इयत्ता 9 वी-10 वी, वार्षिक मदत 75,000, समाविष्ट घटक शुल्क, वसतिगृह शुल्क, परीक्षा फी, पुस्तके, गणवेश, विशेष बाबी 8 वी 9 वीच्या गुणांवर आधारितमेरिट यादी.

इयत्ता 11 वी-12 वी, वार्षिक मदत 1,25000, समाविष्ट घटक शुल्क,वसतिगृह शुल्क, प्रयोगशाळाशुल्क, कोचिंग फी, पुस्तके, गणवेश, विशेष बाबी 10 वी/ 11 वीच्या वीच्या गुणांवर आधारितमेरिट याद

अर्ज प्रक्रिया :- राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे, शाळा नोडल अधिकारी ऑनलाईन पडताळणी करेल,राज्य सरकारकडून अंतिम मंजूरी, मुलगे व मुलींसाठी स्वतंत्र मेरिट यादी तयार, शिष्यवृत्तीची रक्कम डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणारअटी व निरीक्षण :- आधार लिंक केलेली उपस्थिती प्रणाली आवश्यक,नियमित उपस्थिती व समाधानकारक शैक्षणिक प्रगती आवश्यक,. इतर शासकीय योजनेंतर्गत एकाच उद्देशासाठी दुहेरी लाभ घेता येणार नाही

अर्ज भरण्याची मुदत :- दि.15 ऑक्टोबर 2025.हे अर्ज https://scholarships.gov.in/ या पोर्टलवर ऑनलाईन भरणे व शाळा नोडल अधिकारी ऑनलाईन पडताळणी करणे.

00000

संबंधित पोस्ट

दसरा मेळावा मराठा समाजाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील काय म्हणाले ते पहा…

५० हजार हक्काची घरे देण्यासाठी मिशन मोडवर काम करा -पालकमंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

मालेगाव स्फोट प्रकरणातून निर्दोष सुटलेल्या हिंदु धर्मयोद्ध्यांचा कोल्हापुरात भव्य सत्कार !‘मालेगाव स्फोट’ हे ‘भगवा आतंकवाद’ सिद्ध करण्याचे काँग्रेसने रचलेले कुंभाड ! – समीर कुलकर्णी यांचा घणाघात

vishwatmaklokswamivarta

ऑनलाईन बुकिंग पोर्टल्सवर शहरांची नावे अद्ययावत करणे आणि प्रतिबंधित नायलॉन मांजा वाहतूक बंदीबाबत विशेष बैठकीचे आयोजन

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षणासाठी तक्रार समिती बंधनकारक

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईतील सेक्टर 44 ए नेरूळ येथे अनधिकृत लॉजींग अँड बोर्डींगवर धडक सीलबंद कारवाई*