vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

सायबर फ्रॉडपासून बचावासाठी जागरूक राहा – डॉ. धनंजय देशपांडे नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वतीने विशेष कार्यशाळा.

सायबर फ्रॉडपासून बचावासाठी जागरूक राहा – डॉ. धनंजय देशपांडे नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वतीने विशेष कार्यशाळा.

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी) : “कमी वेळेत जास्त पैसा मिळवून देणारे संदेश किंवा सोशल मीडियावरील आकर्षक जाहिराती या फसवणुकीचे मुख्य साधन आहेत. यामागे ‘मोह’ हा घटक सर्वाधिक कार्यरत असतो. त्यामुळे कोणत्याही अनोळखी योजनेच्या आमिषाला बळी न पडणे, हेच सायबर फसवणूक टाळण्याचे मोठे शस्त्र आहे,” असे प्रतिपादन सायबर जागृती क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार विजेते डॉ. धनंजय देशपांडे यांनी केले.

नोंदणी व मुद्रांक विभाग (रजिस्ट्री कार्यालय) यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित विशेष कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी सह जिल्हा निबंधक व्ही.डी. गांगुर्डे, आर.बी. मुळे, अशोक आटोळे उपस्थित होते. वाढत्या ऑनलाईन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांना याबाबत योग्य मार्गदर्शन होणे आवश्यक असल्याने ही कार्यशाळा घेण्यात आली.

या प्रसंगी नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक विजय भालेराव यांनी प्रास्ताविक केले. तर जळगावचे ॲड. सुनिल तारे यांनी नोंदणी व मुद्रांक विषयावर मार्गदर्शन केले.

डॉ. देशपांडे यांनी सांगितले की, अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉल/मेसेजला प्रतिसाद देऊ नका तसेच अनोळखी लिंक क्लिक करू नये, कारण त्यामध्ये व्हायरस असू शकतो. फोटो आयडीसाठी मूळ आधार न देता ‘मास्क आधार’ वापरावा. आर्थिक फसवणूक बहुतेक वेळा शुक्रवारी दुपारी होते. कारण शनिवार-रविवारी बँका बंद असल्याने चोरट्यांना पैसे लपवण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे नागरिकांनी विशेष सावध राहावे.

कार्यशाळेला संभाजीनगर, बीड आणि जालना जिल्ह्यातील नोंदणी व मुद्रांक कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुय्यम निबंधक ए.के. तुपे यांनी आभार मानले.

संबंधित पोस्ट

भुईकोट किल्ल्याच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा!जिल्हा प्रशासन व लष्कर प्रशासनामध्ये सामंजस्य करार;पर्यटन विकासाला मिळणार नवी गती..

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण युवकांसाठी सुवर्णसंधी: जिल्ह्यात 5 कौशल्य विकास केंद्रप्रशिक्षण संस्थांकडून 17 ऑक्टोबरपूर्वी प्रस्ताव आमंत्रित

vishwatmaklokswamivarta

माहिती अधिकारीपदी संजीवनी जाधव-पाटील रुजू

चिखली येथे भव्य बौद्ध वधू वर परिचय मेळावा

vishwatmaklokswamivarta

एसएसबी परीक्षेच्या मोफत प्रशिक्षणासाठी 17 सप्टेंबरला मुलाखती 

vishwatmaklokswamivarta

खरीप 2025 हंगामासाठी अन्नधान्य व वाणिज्यिक पिके व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत पिकांच्या अनुदानावरील प्रमाणित बियाण्यांकरिता अर्ज करावेत