vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

पोस्टाची नवीन पार्सल पॅकेजिंग सुविधा नागरिकांच्या सेवेत

पोस्टाची नवीन पार्सल पॅकेजिंग सुविधा नागरिकांच्या सेवेत

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी) – ग्राहकांची सोयीसाठी इंडिया पोस्टने छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील तीन महत्वाच्या टपाल कार्यालयांमध्ये समर्पित पार्सल पॅकेजिंग युनिट्स (PPUs) सुरू केली आहेत. बजाजनगर उपडाकघर, सिडको कॉलनी, उपडाकघर आणि मुख्य उपडाकघर यांचा समावेश आहे.

या युनिट्समुळे ग्राहकांना दर्जेदार साहित्य, प्रमाणित पद्धतीने पार्सल पॅक करण्याची सेवा मिळणार आहे. ही सेवा देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय शिपिंगच्या नियमांनुसार दिल्या जातात. अनेक व्यक्तींना किंवा लघुउद्योगांना योग्य पॅकेजिंग साहित्य किंवा मार्गदर्शन सहज मिळत नाही; अशांसाठी ही सुविधा विशेष उपयुक्त ठरणार आहे.

पॅकिंगपासून, बुकिंग व वितरणापर्यंत सर्व सुविधा आता एका छताखाली उपलब्ध आहेत. तसेच देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय दिवाळी फराळ पार्सल बुकिंग सुविधा ट्रॅकिंगसह सर्व पोस्ट ऑफिसमध्ये सुरू असून, आप्तेष्टांपर्यंत फराळ पोहोचवणे अधिक सोपे झाले आहे.

ही संकल्पना इंडिया पोस्टच्या सेवा आधुनिकीकरण व ग्राहककेंद्री दृष्टिकोनाचा भाग आहे. वाढत्या ई-कॉमर्स व्यवहारांमुळे आणि आंतरराष्ट्रीय संपर्क वाढल्याने या सुविधा सामान्य नागरिक, लघुउद्योग, व्यापारी व उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.

या सेवेची वैशिष्ट्ये म्हणजे प्रमाणित साहित्यांसह व्यावसायिक पॅकेजिंग सेवा, वाजवी दरातील पॅकेजिंग शुल्क, जगभरातील देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पार्सल बुकिंग, ट्रॅकिंग सुविधा, कस्टम्स कागदपत्रांसाठी समर्पित कर्मचारी असून अधिक माहितीसाठी 9371710845 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात २९० पदांची भरती;कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १४४ पदांसह विविध जागा

vishwatmaklokswamivarta

महिलांसाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारावे- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यावर ..

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद लक्षवेधी :प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्यांवर कोणताही अन्याय होणार नाही- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समितीस 14 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

जम्मू-काश्मिरहून परतलेल्या पर्यटकांशी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी साधला संवाद

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी