vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांची मंत्रालयातील प्रदर्शनास भेट

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांची मंत्रालयातील प्रदर्शनास भेट

मुंबई, प्रतिनिधी : मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत (लिडकॉम) आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनास आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी भेट दिली. यावेळी आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे उपस्थित होते

या प्रदर्शनामध्ये चर्म उत्पादने तसेच शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मार्फत तयार करण्यात आलेल्या शबरी नॅचरलची उत्पादने आहेत.     मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, शबरी नॅचरल्सने आदिवासी संस्कृतीचा समृद्ध वारसा आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जतन करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. ई-कॉमर्स आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून जागतिक बाजारपेठेत आदिवासी उत्पादनांना वेगळी ओळख मिळत आहे. या उपक्रमामुळे पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या उत्पादनांना नव्या बाजारपेठेत प्रवेश मिळत आहे.

शबरी नॅचरल्सच्या उपक्रमामुळे आदिवासी समाजातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे. स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळणे ही एक अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

 

0000

संबंधित पोस्ट

सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम पोलीस दलाने करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित ‘तरंग-२०२५’ कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

बहाई धर्मगुरू दिव्यात्म बाब यांचा श्रद्धांजलीपर बलिदान दिवस साजरा

संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती निर्वाचन क्षेत्रामध्ये6, 7 व 9 फेब्रुवारी रोजी मद्य विक्री बंद..

vishwatmaklokswamivarta

भाजपा जालना महानगरात “मन की बात” कार्यक्रमाला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पंतप्रधान मोदीजींच्या प्रेरणादायी विचारांनी कार्यकर्त्यांना नवचेतना – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

 शहरातील शाळा इमारतींच्या फायर ऑडिट संदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

कु. श्रेयांश व कु. काशि यांच्या पालकांनी किंवा नातेवाईकांनी ठाणे बाल कल्याण समिती किंवा विश्व बाल केंद्र, नेरुळ यांच्याशी संपर्क साधावा

vishwatmaklokswamivarta