vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सोलापूर शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल-महापालिकेच्या इंद्रभुवन येथे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे 

सोलापूर शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल-महापालिकेच्या इंद्रभुवन येथे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे

राज्य प्रतिनिधी

सोलापूर शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मंजूर झालेल्या अडतीस घंटागाड्यांपैकी पहिल्या टप्प्यात खरेदी करण्यात आलेल्या पंचवीस घंटागाड्यांचे लोकार्पण आज महापालिकेच्या इंद्रभुवन येथे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले.पालकमंत्री गोरे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीने शहर स्वच्छ व आकर्षक करण्यासाठी एकूण अडतीस घंटागाड्यांची मंजुरी दिली आहे. त्यापैकी पंचवीस गाड्यांचे लोकार्पण झाले असून उर्वरित गाड्यांची खरेदी लवकरच पूर्ण होणार आहे.

कार्यक्रमाला आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वीणा पवार व संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधीक्षक अनिल चराटे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, मुख्य आरोग्य निरीक्षक नागेश मेंडगुळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या गाड्यांच्या लोकार्पणामुळे शहरातील कचरा संकलन व्यवस्थेला अधिक गती मिळणार आहे. विशेषतः ‘दरवाजा-दरवाजा कचरा संकलन’ उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होईल. नागरिकांना वेळेत आणि सुटसुटीत सेवा उपलब्ध होणार असून शहरातील स्वच्छता मोहिमेला नवी उभारी मिळणार आहे.

या उपक्रमामुळे सोलापूर शहर स्वच्छतेच्या मोहिमेत अधिक सक्षम होईल. स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी सोलापूर बनविण्याच्या दिशेने हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

0000

संबंधित पोस्ट

सेवा सहकारी संस्थांना काम वाटपासाठी 3 फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा वार्षिक योजना निधीतून पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर बांधलेल्या किल्ला भिंतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे नेते बालेंद्र शाह यांनी आज नेपाळच्या पंतप्रधानपदी शपथ घेतली

जादूटोणा व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी -अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ,विज्ञान युगातही अंधश्रद्धेचा विळखा जनतेला फसवल्यास सात वर्षापर्यंत शिक्षा…

आयपीएल जिंकल्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर टीम जबाबदार !पोलिस काही जादूगर नाहीत किंवा त्यांच्याकडे ‘अल्लादिनचा चिराग’ नाही असंही कॅटने म्हटलं सर्व IPS अधिकाऱ्यांचे निलंबन मागे..

राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथ, कबड्डी स्पर्धा नागपूर, कुस्ती स्पर्धा बीड तर खो-खो स्पर्धेचे बारामती येथे आयोजन-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय-महाराष्ट्राची क्रीडा परंपरा अधिक बळकट करण्यासाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार