vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आत्मविश्वास, इच्छाशक्ती, कठोर परिश्रमाची तयारी व अभ्यासात सातत्य ठेवा, यश हमखास मिळेल,कौतुक सोहळा : आमदार नारायण कुचे यांचा इयत्ता दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना सल्ला…

आत्मविश्वास, इच्छाशक्ती, कठोर परिश्रमाची तयारी व अभ्यासात सातत्य ठेवा, यश हमखास मिळेल,कौतुक सोहळा : आमदार नारायण कुचे यांचा इयत्ता दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना सल्ला…

जालना प्रतिनिधी : आत्मविश्वास, इच्छाशक्ती, कठोर परिश्रमाची तयारी व अभ्यासात सातत्य ठेवा, यश हमखास मिळेल, असे प्रतिपादन आमदार नारायण कुचे यांनी व्यक्त केले. जालना शहरातील पाठक लॉन्सवर रविवारी सकाळी जालना जिल्हा चर्मकार समाजातर्फे इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे उदघाटक म्हणून ते बोलत होते. प्रारंभी दीपप्रज्वलन करत महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालना शहर मनपा आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर तर प्रमुख अतिथी म्हणून कल्याण डोंबीवली मनपा उपायुक्त वंदनाताई गुळवे, प्राचार्य डॉ. गणेश भगुरे, प्रा. डॉ. युवराज गहेराव, शिक्षक रोहिदास शिखरे होते. तर मार्गदर्शक म्हणून बुलढाणा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक रमेश विठोरे व बदनापूर येथील रावसाहेब पाटील दानवे कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्या डॉ. ललीता भगुरे-आक्षेय होत्या. आ. कुचे म्हणाले, इयत्ता दहावी, बारावी, पदवीनंतर करीअरची निवड करताना केवळ प्रशासकीय सेवाच नव्हे तर उद्योग-व्यवसाय, राजकारणातही भरपूर संधी उपलब्ध आहेत, सर्वांसाठी ही क्षेत्रे खुली आहेत. त्यामुळे आपले ध्येन निश्चित करून त्या दिशेने मार्गक्रमण करा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. उपायुक्त गुळवे यांनी मुलगी शिकली तर घर-कुटूंबच नव्हे तर समाजाचा, देशाचा ती भक्कम आधार बनू शकते असे स्वानुभव सांगत मुलींना भरपूर शिकवून स्वावलंबी बनवण्याचे आवाहन त्यांनी पालकांना केले. प्राचार्य डॉ. भगुरे यांनीही गुणवंतांना सर्वत्र विपूल संधी असल्याचे नमुद केले. यावेळी त्यांनी विज्ञानातील विविध दाखले देऊन शिक्षणाचे महत्व सांगितले. शिक्षक शिखरे यांनी शालेय शिक्षणाचे महत्व पटवून देत यात पालकांची भूमिका विषद केली. प्राचार्या भगुरे-आक्षेय यांनी मोबाईल, एआय यासारख्या नवतंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बन्सीदास ढवळे, सुत्रसंचालन प्रा. जया वडोदे-डोंगरे तर उपस्थितांचे आभार सचिन इरछे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

प्रशासकीय सेवेतून समाजाची सेवा करता येतेविद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून प्रशासकीय सेवत यावे जेणेकरून समाजाची सेवा करता येईल, गोर-गरीब, गरजूंना मदत करता येईल. प्रत्येकाला कामानिमित्त प्रशासकीय अधिकार्‍यांकडे यावेच लागते, त्यांच्या स्वाक्षरीला महत्व आहे. यामुळे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी बना आणि आपल्या समाजाची सेवा करण्याचा सल्ला प्रा. डॉ. गहेराव यांनी दिला.

क्षमता ओळखून करीअर निवडा

नीट, जेईई परीक्षेची तयारी करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून यातून प्रचंड स्पर्धाही निर्माण होत आहे. मात्र, आपली आवड, अंगभूत क्षमता व भविष्यातील संधी लक्षात घेऊन क्षेत्र निवडले तरच भरघोस यश मिळू शकते, यामुळे कुणाच्या सांगण्यावरून नव्हे तर स्वत:च्या क्षमता ओळखून करीअर निवडा असा सल्ला दुय्यम निरीक्षक रमेश विठोरे यांनी दिला.

==============================फोटो कॅप्शन : जालना शहरातील पाठक लॉन्सवर चर्मकार समाजातर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे उदघाटन करताना आ. नारायण कुचे. सोबत मनपा आयुक्त संतोष, खांडेकर, कल्याण डोंबीवली मनपा उपायुक्त वंदनाताई गुळवे, प्राचार्य डॉ. गणेश भगुरे, प्रा. डॉ. युवराज गहेराव, शिक्षक रोहिदास शिखरे, दुय्यम निरीक्षक रमेश विठोरे, प्राचार्या डॉ. ललीता भगुरे-आक्षेय आदी.

संबंधित पोस्ट

कन्यादिन साजरा; पीसीपीएनडीटी, बालविवाह प्रतिबंध कायद्याची जनजागृती मुलींच्या जन्माचे स्वागत करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जिल्हाधिकाऱ्यांकडून चिया सिड उत्पादन, अन्नप्रक्रिया, मत्स्य व्यवसायाची पाहणी*उत्पादनाच्या ब्रँडींगवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

पणन मंत्री जयकुमार रावल यांनी-महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या सुविधांना दिली भेट..

गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त आयोजन

कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या माध्यमातून दिव्यांगांना सेवा देऊन आत्मनिर्भर करणार – मुख्य सचिव राजेश अग्रवाल ‘दिव्यांग व्यक्तींच्या समावेशन व सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) क्षमता उलगडणे’ या विषयावर प्री-समिट राऊंडटेबलचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रशासन सदैव प्रयत्नशील    -जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ