vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे सरळसेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पदांची भरती…

सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे सरळसेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पदांची भरती…

ठाणे, प्रतिनिधी- सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट क) एकूण 72 पदांकरीता फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. वरील पदांपैकी 01 पद हे अपंग संवर्गातून किमान 40% अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करुन गुणवत्ता/उपलब्धतेनुसार भरण्यात येईल.

ही भरती प्रक्रिया टिसीएस-आयओएन यांच्यामार्फत होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. पात्र उमेदवारांना वेब-बेस्ड (Web-based) ऑनलाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर Recruitment Tab येथे दि.14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून (Resources Tab -> दि.05 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 23.59 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक राहील. त्यानंतर ही वेबलिंक बंद होईल, असे ठाणे/पालघर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव (निवृत्त) यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मराठा समाजातून उद्योजक निर्मितीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचे योगदान महत्वपूर्ण*

हातमाग कापड स्पर्धाः इफरा अंजूम प्रथम तर शबाना गिराम द्वितीय..

vishwatmaklokswamivarta

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यशकथा भाग 2 अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मदतीने मंदार शिंदेची मेणबत्ती, कापूर व्यवसायवृद्धी …

vishwatmaklokswamivarta

औषधी व सुगंधी वनस्पतीच्या लागवड अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीसाठी कृषी विभागाकडे अर्ज करण्याचे आवाहन

करदाता सेवा महासंचालनालयाची, मुंबई विभागीय शाखा, पुणे-I आणि पुणे-II केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालये तसेच भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या पश्चिम विभागीय सनदी लेखापाल विद्यार्थी संघटनेच्या वतीने वस्तू आणि सेवा कर 2.0 – भारतातील अप्रत्यक्ष कर प्रणालीतील मोठ्या सुधारणा या विषयावर परिसंवादाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta