vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरस्थानिक बातम्या

पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहराला जोडणारा सांगवी बोपोडी पूल तीन महिन्यासाठी वाहतुकीस बंद

पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहराला जोडणारा सांगवी बोपोडी पूल तीन महिन्यासाठी वाहतुकीस बंद

पुणे प्रतिनिधी –

पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन शहरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला सांगवी-बोपोडी पूल आता पुढील तीन महिन्यांसाठी वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. मुळा नदीवरील या पुलावर सुरू होणाऱ्या कमान बांधणी आणि सुशोभीकरणाच्या कामामुळे वाहतुकीस पूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाने यासंदर्भात औपचारिक आदेश जारी केला असून, वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.

महापालिकेने नागरिकांना विनंती केली आहे की, कामकाजाच्या काळात वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, तसेच पुलाजवळ अनावश्यक गर्दी करू नये. कामाच्या ठिकाणी प्रवेश बंद ठेवण्यात आल्यामुळे कोणत्याही प्रकारची अपघाताची शक्यता टाळण्यासाठी पोलिस आणि पालिकेचे कर्मचारी दिवस-रात्र पहारा देत आहेत. तसेच, पादचाऱ्यांसाठी जवळच असलेल्या औंध ब्रिज आणि पुणे विद्यापीठ ब्रिजचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सांगवी-बोपोडी पूल हा मुळा नदीवरील एक ऐतिहासिक आणि वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा पूल मानला जातो. या पुलावर कमान उभारण्याचे तसेच सुशोभीकरणाचे काम सुरु करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

ऑरेंज गेट – मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगद्याच्या कामाला गती द्याव- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसप्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कालबद्ध नियोजन करावे..

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते पारसिक हिलवर वृक्षारोपण नवी मुंबईत आठही विभागांत 2000 हून अधिक देशी वृक्षारोपांची लागवड..

मातृतीर्थ सिंदखेड राजात जिजाऊभक्तांचा जनसागर !राष्ट्रमाता जिजाऊंचा ४२८ वा जन्मोत्सव थाटात साजरा

vishwatmaklokswamivarta

विविध योजनांचा लाभ घेण्याचे वसंतराव नाईक विमुक्त व भटक्या जमाती विकास महामंडळाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट इशारा जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांना आज दिनांक ०७ जुलै २०२५ रोजी सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकाऱ्यांकडून राणीघाट अपघातातील जखमींची विचारपूस