vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईकरांना पाणीटंचाई – दिवाळीच्या अभ्यंग स्नानाच्या दिवशीच मुंबईकरांना पाणी टंचाई …

मुंबईकरांना पाणीटंचाई – दिवाळीच्या अभ्यंग स्नानाच्या दिवशीच मुंबईकरांना पाणी टंचाई …

– काही दिवसापासून पाणीपुरवठा अतिशय कमी दाबाने होत असल्यामुळे अनेक कुटुंबांना पाणीटंचाईचा सामना-

मुंबई प्रतिनिधी

मुंबईतील शिव, प्रतीक्षानगर, अंधेरी, गोराई या भागात गेल्या काही दिवसापासून पाणीपुरवठा अतिशय कमी दाबाने होत असल्यामुळे अनेक कुटुंबांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पंचशील नगर, प्रतीक्षा नगर, जीटीबीचा परिसर या भागात नागरिकांना अक्षरशः टँकरने पाणी पुरवठा होत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं पूर्ण क्षमतेने भरलेली असताना देखील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावं लागतं असल्यामुळे या परिसरात नाराजी आहे. अंधेरी पूर्व, विलेपार्ले पूर्व या परिसरात देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यासोबतच विजयनगर सोसायटी, छत्रपती संभाजी नगर, पार्लेश्वर सोसायटी, पोदारवाडी या भागात देखील पाणी कमी येत असल्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी आहे.

यासंदर्भात रहिवाश्यांनी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांकडे तक्रार देखील केली आहे. यावर पालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे की, ऑक्टोबरमध्ये उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे, त्यामुळे पाण्याचा वापर देखील वाढला आहे. अशी ही बातमी सह्याद्री न्यूज मध्ये ही आलेली आहे

0000

संबंधित पोस्ट

संत ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे *पालखी सोहळा सुखकर आणि सुरक्षित पार पडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे–विभागीय आयुक्त शितल तेली-उगले*

कोळसा वाहतुकीमुळे पिकांची होणारी नुकसानभरपाई ठरवण्यासाठी समिती गठीत-मंत्री शंभूराज देसाई

नागपूर येथील प्राणी संग्रहालयातील तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे- वनमंत्री गणेश नाईक

सहकारी बँकांनी प्रगतीसाठी नवीन तंत्रज्ञान स्विकारणे आवश्यक -केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह

vishwatmaklokswamivarta

थेट कर्ज योजनेच्या लाभासाठी 15 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा..