vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मातृतीर्थ सिंदखेड राजात जिजाऊभक्तांचा जनसागर !राष्ट्रमाता जिजाऊंचा ४२८ वा जन्मोत्सव थाटात साजरा

मातृतीर्थ सिंदखेड राजात जिजाऊभक्तांचा जनसागर !राष्ट्रमाता जिजाऊंचा ४२८ वा जन्मोत्सव थाटात साजरा

राज्य प्रतिनिधी-राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचा ४२८ वा जन्मोत्सव सोहळा सोमवारी मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत दर्शनासाठी सकाळपासून जनसागर लोटला होता. सकाळी ६ वाजता राजे लखुजीराव जाधव राजवाड्यातील राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थानी वंशज राजे विजयसिंह जाधव, शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. तसेच केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी सपत्नीक राजमाता माँ जिजाऊ यांची महापूजा करुन अभिवादन केले.

यावेळी आमदार मनोज कायंदे, माजी मंत्री डॅा. राजेंद्र शिंगणे, माजी शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनीही राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

सिंदखेडराजा विकास आराखडा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील – केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव

राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेबांना अभिवादन करुन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले की, आज राष्ट्रमाता जिजाऊ यांचा ४२८ वा जन्मदिवस आहे. त्यानिमित्त देशभरातून जिजाऊभक्त, शिवप्रेमी जिजाऊ यांच्या जन्मस्थानी येतात. हे मातृतिर्थ सिंदखेड राजा भूमीचे वैभव आहे. या जन्मोत्सवाचा जनमानसात प्रचंड उत्साह दिसून येत आहे. त्यांच्या दर्शनाने अनेकांना नवी प्रेरणा मिळते. राज्य शासनाने सिंदखेड राजा विकास आराखडा जाहीर केला आहे. यातील कामे वेगवेगळ्या विभांगांकडे दिलेली आहेत. या ठिकाणच्या बऱ्याच वास्तू पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली येतात. दरवर्षी या आराखड्यातील नवीन कामे पूर्ण झालेले दिसून येते. पुरातत्व विभागाचे काम अत्यंत बारकाईने केले जात असल्यामुळे कामे पूर्ण व्हायला उशीर लागत असल्याचे स्पष्ट करत त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सिंदखेड राजा विकास आराखडा लवकरात लवकर पूर्ण करुन घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

🚫 सावधान! आचारसंहिता भंगाचा प्रयत्न महागात पडणार; जालना प्रशासनाचा कडक इशारा! ⚖️

vishwatmaklokswamivarta

माथेरान-नेरळ घाट रस्त्यावर जड-अवजड वाहनांना बंदी सोमवार ते गुरुवारच रस्ता दुरुस्तीची कामे; जीवनावश्यक सेवांना सूट

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव इमाव कल्याण विभागाकडे मागविले

vishwatmaklokswamivarta

मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून घोषित करण्याची मागणी-मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोट निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार- अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस