vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार

माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार…

गोंदिया, प्रतिनिधी: राज्याचे वित्त व पाटबंधारे विभागाचे माजी मंत्री तथा माजी खासदार महादेवरावजी शिवणकर यांच्यावर आज शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. काल सकाळी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले होते.

येथील साकरीटोला घाट, सालेकसा रोड आमगाव येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी शासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड या उपस्थित होत्या. त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

. शिवणकर हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. गोंदिया जिल्ह्याची निर्मिती त्यांच्या कार्यकाळात झाली असून त्यांना जिल्ह्याचे शिल्पकार म्हणून संबोधले जाते. त्यांनी पाटबंधारे मंत्री असताना गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिले. जिल्ह्यातील सिंचनाच्या समस्या सोडविण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता.

आज त्यांच्या पार्थिवाचे दर्शन आमदार डॉ. परिणय फुके, आमदार विनोद अग्रवाल यांच्यासह जिल्ह्यातील जनतेने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

संबंधित पोस्ट

आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

महसुल खात्याचे क्रांतीकारी निर्णय जिल्हास्तरावर त्वरीत राबविण्यात यावे.. महसुलमंत्री तथा पालकमंत्री अमरावती श्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश.

हा केवळ श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाचा स्टॉल नाही, तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

बंद उद्योग घटकांनी एक महिन्याचा आत उद्योग सुरू करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

लोकशाही वाचविणाऱ्या सेनानींचे योगदान देश कदापी विसरू शकणार नाही आणीबाणी हा भारतीय लोकशाहीवरील काळा डाग” – भास्कर आबा दानवे

भारतीय रेल्वेचा नवीन वर्ष 20 26 चा नवा नियम! 1 जानेवारीपासून रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल, मुंबईतून सुटणाऱ्या ट्रेन….

vishwatmaklokswamivarta