vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

मुंब्रा पोलिसांची दिवाळीची भाऊबीजला नागरिकांना खास भेट- हरविलेले मोबाईल मालकांच्या स्वाधीन!

मुंब्रा पोलिसांची दिवाळीची भाऊबीजला नागरिकांना खास भेट- हरविलेले मोबाईल मालकांच्या स्वाधीन!

ठाणे प्रतिनिधी

मुंब्रा : भाऊबीजच्या दिवशी मुंब्रा पोलिसांनी नागरिकांना एक खास भेट दिली. मुंब्रा पोलीस ठाण्याने चालू वर्षात तसेच मागील वर्षात हरविलेले ४० मोबाईल फोन शोधून काढून त्यांच्या मूळ मालकांना परत केले. या मोबाईलची एकूण किंमत ₹८,२७,२००/- एवढी आहे.

या उल्लेखनीय कामगिरीत पोलीस शिपाई सागर महांगडे, महेश जाधव आणि पोलीस नाईक माळी यांनी विशेष परिश्रम घेतले. CEIR पोर्टलच्या मदतीने हरविलेले मोबाईल ट्रेस करून नागरिकांना सुपूर्द करण्यात आले.

हा विशेष कार्यक्रम मा. सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आला.

दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, हरविलेला मोबाईल शोधण्यासाठी तात्काळ www.ceir.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.

संबंधित पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील मुख्य आरोपी गँगस्टर अनमोल बिश्नोईला राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएनं ताब्यात…

vishwatmaklokswamivarta

साकीनाका येथे बेकायदेशीर कॉल सेंटरचा पर्दाफाश, फसवणूक करणाऱ्या सहा जणांना अटक*

vishwatmaklokswamivarta

दहिसर पोलिसांची मोठी कारवाई!  बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, ४ जणांना अटक

10 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि अन्य तिघांना अटक

vishwatmaklokswamivarta

नाशिक जिल्ह्यात खळबळजनक  धक्कादायक!बातमी- गावच्या सरपंचानेच केला दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, आरोपी अटक

vishwatmaklokswamivarta

नीट-यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणी सीबीआय कडून अहिल्यानगर आणि पुणे येथून आणखी दोन आरोपींना अटक