vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या सहा अफगाणी नागरिकांवर गुन्हे शाखेकडून कारवाई

बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या सहा अफगाणी नागरिकांवर गुन्हे शाखेकडून कारवाई

मुंबई प्रतिनिधी-

मुंबई शहरातील कुलाबा व धारावी परिसरात अफगाणी नागरीक बनावट नावाने अवैधरित्या रहात असल्याबाबत गुन्हे शाखेस गोपनिय माहिती प्राप्त झाली होती. सदर प्रकरणाचा उलगडा करण्याकरीता गुन्हे शाखा कक्ष १ व कक्ष ५ तर्फे स्वतंत्र पोलीस पथके तयार करण्यात आली. प्राप्त माहितीच्या अनुषंगाने परिसरात लक्ष ठेवून गोपनीय माहिती काढून मिळालेल्या माहितीची पडताळणी करण्यात आली. नमुद अफगाणी नागरिकांना फोर्ट, कुलाबा, व धारावी मुंबई परिसरात सापळा रचून गुन्हे शाखा कक्ष १ व कक्ष ५ तर्फे पकडण्यात आले. त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी त्यांची नावे १) मोहम्मद रसूल नसोजय खान, वय २४ वर्षे २) मोहम्मद जाफर नबीउल्लाह खान, वय ४७ वर्षे, ३) अख्तर मोहंमद जमालउददीन, वय ४८ वर्षे ४) झिया उल हक मोहंमद गौसिया खान, वय ३६ वर्षे, ५) अब्दुल मन्नन वाहिद खान, वय ३६ वर्षे ६) असद समसुददीन खान, वय ३६ वर्षे, अशी सांगितली.

परंतु गुन्हे शाखा कक्ष १ व कक्ष ५ च्या पोलीस पथकांनी त्यांच्याकडे तांत्रिक बाबींच्या आधारे तसेच कौशल्याने स्वतंत्रपणे विचारपूस केली असता त्या इसमांनी ते अफगाणी नागरीक असल्याचे कबूल करून ते सन २०१५, २०१७, २०१९ मध्ये वैद्यकिय व्हिसावर भारतात प्रथम दिल्ली येथे आल्याचे सांगुन त्यांच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतर ते बनावट नावाने भारतात अवैधरित्या वास्तव्य करीत असल्याची कबुली दिली आहे. कारवाई करण्यात आलेल्या सहा अफगाणी इसमांची मुळ नावे ही १) अब्दुल समद हाजी अहमद झाई नौरोजी, वय ४७ वर्षे, मुळ गाव दुराही, कंधार, देश अफगानिस्तान, २) मोहम्मद रसोल कमलुद्दीन खाकसर, वय २४ वर्षे, मुळ गाव नवा काबुल, ३) अमील उल्लाह वय ४८ वर्षे मुळ गाव झाबुल, ४) झिया उल हक अहमदी वय ३६ वर्षे, मुळ गाव काबुल, ५) मोहंमद इब्राहिम गजनवी वय ३६ वर्षे मुळ गाव काबुल, ६) असद खान तारा काई वय ३६ वर्षे, मुळ गाव काबुल, अफगानिस्तान अशी असल्याचे निष्पन्न झाले आहेअशा प्रकारे भारतामध्ये बनावट नावाने व बनावट कागदपत्रांच्या आधारे अवैधरित्या रहात असलेल्या अफगाणी नागरीकांना पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष १ व कक्ष ५ चे पथकांना यश प्राप्त झाले आहे. त्यांना परत त्यांचे मुळ देशात अफगानिस्तान येथे पाठविण्यात येत आहे.

सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस आयुक्त, मुंबई, श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे), श्री लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, (प्रकटीकरण), श्री. राज तिलक रौशन, व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (डी दक्षिण) श्री. दिनकर शिलवटे, यांचे मार्गदर्शनाखाली कक्ष ५ चे प्र. पो. नि. घनश्याम नायर व कक्ष १ चे प्र.पो.नि. अजय कुलकर्णी यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

संबंधित पोस्ट

चेन्नई, तामिळनाडू येथून सायबर क्राइम चा आरोपीला  अटक: सायन पोलीस स्टेशन.एका महत्त्वपूर्ण यशामध्ये, सायबर पोलिस स्टेशनने ₹1,00,000 च्या आर्थिक फसवणुकीच्या सायबर गुन्ह्याचा उकल..

vishwatmaklokswamivarta

पुण्यात भररस्त्यात रिक्षा चालकावर  गोळीबार आणि कोयत्याने वार, आंदेकर टोळीचे कनेक्शन

vishwatmaklokswamivarta

नयनरम्य परिसर  लोणावळा व्हिला बुकिंग प्रकरणात ऑनलाइन फसवणूक उघड; आरोपीला अटक

vishwatmaklokswamivarta

अंधेरी रेल्वे स्थानकावर ‘ऑपरेशन लाईफ सेव्हिंग’; चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशी बचावले.

vishwatmaklokswamivarta

फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक; चुनाभट्टी पोलिसांनी कारवाई केली.

नियमबाह्य तेजस्वी एलईडी बल्बप्रकरणी1044 वाहनधारकांना साडेचार लाख रुपये दंडाची आकारणी वायुवेग पथकाची वर्षभरातील कारवाई