vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

डास प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता सायंकालीन विशेष धुरीकरण मोहिमेचे आयोजन

डास प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता सायंकालीन विशेष धुरीकरण मोहिमेचे आयोजन

        नवी मुंबईत प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात डास प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्याकरिता नियोजित साप्ताहिक वेळापत्रकानुसार डासअळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण कार्यक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे. याकरिता प्रत्येक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संपूर्ण कार्यक्षेत्राचा विचार करुन साप्ताहिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे, जेणेकरुन प्रत्येक कार्यक्षेत्रात आठवड्यातून एकदा फवारणी व धुरीकरण करण्यात येते.

  1.             नवी मुंबई महागनरपालिका कार्यक्षेत्राची भौगोलिक रचना लक्षात घेता नागरी वस्ती लगत असणारा खाडी किनारा व त्यालगत असणारा दलदलीचा परिसर हिवाळा कालावधीत डासांची घनता वाढण्याकरिता पोषक असल्याने या कालावधीत इतर कालावधीपेक्षा जास्त प्रमाणात डास प्रादुर्भाव जाणवतो. परिणामी डास प्रादुर्भावाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असतात.

             या अनुषंगाने नागरिकांना डासांचा जास्त त्रास जाणवू नये या उद्देशाने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डास प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर सकाळच्या कालावधीत होणा-या नियमित धुरीकरणासोबत दि. 3 नोव्हेंबर 2025 पासून दि. 28 फेब्रुवारी 2026 पर्यंतच्या दीर्घ कालावधीत सायंकालीन धुरीकरण विशेष मोहिम सुरु करण्यात आलेली आहे. ही धुरीकरण कार्यवाही सायं. 5:30 ते 6:00 च्या सुमारास सुरु करण्यात येते व त्या दिवसाचे नियोजित फिलींग पूर्ण होईपर्यंत करण्यात येते.

            सकाळचे धुरीकरण साप्ताहिक वेळापत्रानुसार नियोजित कार्यक्षेत्रामधील बंद गटारांमध्ये केले जाते तर सायंकालीन धुरीकरण हे गावठाण, झोपडपट्टी व सोसायटी अंतर्गत मीटर रुम, जिने अशा ठिकाणी नियोजित पंधरवडा कार्यक्रमानुसार राबविले जाते.

            दि. 3 नोव्हेंबर 2025 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सायंकालीन धुरीकरण करण्यास आठवड्याकरिता 565 अतिरिक्त धुरीकरण फिलींगनुसार नियोजन करण्यात आले असून सदरच्या फिलींग्सचा वापर सायंकालीन धुरीकरणाच्या पंधरवडा वेळापत्रकानुसार केला जाणार आहे.

            तरी नवी मुंबईकर नागरिकांनी डास प्रतिबंधासाठी नियोजन करून हाती घेतलेली विशेष धुरीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करावे व धुरीकरणाबाबत काही सूचना अथवा तक्रारी असल्यास नजिकच्या नमुंमपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर – २४३ जणांची तपासणी

इ संजीवनी ओपीडी’द्वारे १ लाख ७४ हजार रुग्णांना मिळाली सेवा

vishwatmaklokswamivarta

आयुष्मान आरोग्य मंदिर आणि राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत 10.18 कोटी महिलांची गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी

जागतिक आरोग्य दिनी विविध आरोग्य योजनांचा शुभारंभ महाराष्ट्र आरोग्य सन्मान सोहळा-२०२५ चे आयोजन

राज्यात आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा मोठा विस्तार २३९९ उपचार कॅशलेस; रुग्णालयांवर कडक नियंत्रण

vishwatmaklokswamivarta

पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी-जिल्हा दक्षता पथकाची बैठक संपन्न