vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळप्रदेश

राज्यस्तरीय सबज्युनीयर टेनिक्वाईट स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन

राज्यस्तरीय सबज्युनीयर टेनिक्वाईट स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन

जालना/प्रतिनीधी – महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशनच्या वतीने दिनांक 14 ते 16 नोव्हेंबर 2025 दरम्यान जालना येथे राज्यस्तरीय सबज्युनीयर टेनिक्वाईट अजिंक्यपद स्पर्धा 2025-26 चे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरीता जालना जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशनच्या वतीने दिनांक 8 नोव्हेंबर 2025 शनिवार रोजी निवड चाचणीचे आयोजन जी.ई,एस. एज्युकेशन कॅम्पस, गणपती मंदीराच्या पाठीमागे, राजुर ता. भोकरदन जि. जालना येथे सकाळी 11 वाजल्यापासुन करण्यात आलेले आहे.

निवड चाचणीत सहभागी होण्याकरीता कोणतेही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी खेळाडुचे वय 14 वर्षाआतील असावे व जन्म तारीख 01/01/2011 किंवा त्यानंतरची असावी. सदर निवड चाचणीतुन 6 मुले व 6 मुलींची निवड करण्यात येईल व हे खेळाडु राज्यस्तर स्पर्धेत जालना जिल्ह्याचे नेतृत्व करतील. टेनिक्वाईट हा खेळ शालेय स्पर्धांमध्ये सहभागी असुन दहावी व बारावीत असणार्‍या खेळाडुंना गे्रस मार्क तथा शासकीय व निमशासकीय आरक्षणास पात्र आहे.

अधिक माहितीकरीता संघटनेचे जिल्हा प्रशिक्षक उमेश खंदारकर, तुषार गर्जे, अमोल काटकर, अमोल सातपुते, क्रांतीभुषन यादव, गोवर्धन वाहुळ, संतोष वाघ, श्रीमती शेख महेजबीन, श्रीमती गिता संगम, श्रीमती करूणा निरेवाड, शेख समीर, सोहेल खान, यांच्याशी संपर्क साधावा.

तरी या सुवर्ण संधीचा जालना जिल्हयातील खेळाडुंनी लाभ घ्यावा असे आवाहन जि.ई.एस. एज्युकेशनल कॅम्पसचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर पा. पुंगळे, सचिव सौ. आशाताई पा. पुगळे, जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशन जालनाचे अध्यक्ष माजी नगरसेवक जयंत भोसले, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे, फें टबॉलचे निरीक्षक शेख अहेमद, देवगिरी विद्या प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बबन दादा सोरटी, क्रीडा अधिकारी श्रीमती लता लोंढे, श्रीमती आरती चिल्लारे, राज्य क्रीडा मार्गदर्शक सिद्धार्थ कदम, आशीष जोगदंड, माजी नगरसेवक बाला परदेसी, ज्ञानेश्‍वर ढोबळे, सुभाष पारे, श्रीमती सुनीता गवई, राजेश शेवाळे, गणेश भि. लांडगे, शेख चाँद पी.जे. जालना जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशन जालना व जालना जिल्हा ऑलंम्पीक असोसिएशन यांच्यावतीने करण्यात आले

शेख चाँद पी.जे.

मो.नं. 9822456366

संबंधित पोस्ट

उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची परीक्षा येत्या रविवारीजिल्ह्यातील निरक्षरांना साक्षर होण्याची संधी..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त संवाद ग्रंथपालांशी;ग्रंथपाल वाचन संस्कृतीचे खरे संवर्धक-डॉ.सुभाष चव्हाण

मोटार वाहन कर व दंड वसुली मोहिमेअंतर्गत कामगिरीची माहिती जाहीर

येत्या रविवारी ‘वैभव – विशाल’ गझल संध्या कार्यक्रम पत्रकार संघांतर्गत वृत्तेश्वर गणेश मंडळाचे आयोजन 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भाजपा जालना शहर व पतंजली योग समिती च्या वतीने शहरात विविध ठिकाणी भव्य योग शिबिरांचे आयोजन