vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील वकिलांकरीता 40 तासांचे मध्यस्थी प्रशिक्षण  उद्घाटन संपन्न

जिल्ह्यातील वकिलांकरीता 40 तासांचे मध्यस्थी प्रशिक्षण  उद्घाटन संपन्न

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- मा.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग राजेंद्र द. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातील वकिलांकरीता 40 तासांचे मध्यस्थी प्रशिक्षण दि.04 नोव्हेंबर ते दि.08 नोव्हेंबर 2025 असे पाच दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन, जिल्हा न्यायाधीश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश माणगाव एस.टी. भालेराव यांच्या संपन्न हस्ते झाले.

याप्रसंगी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग श्रीमती तेजस्विनी म. निराळे यांनी सदरहू प्रशिक्षण वकिलांसाठी कसे उपयुक्त आहे याची माहिती दिली. अॅड.प्रसाद पाटील, अलिबाग वकिल संघटनेचे अध्यक्ष यांनी उपस्थितांना मेडिएशनचे महत्त्व सांगताना मेडिएशनमुळे वादातील पक्षकारांना लवकर वादाचे निराकरण करता येते, त्यामुळे पक्षकारांचा वेळ, पैसा वाचतो, तसेच न्यायालयाला जटील प्रकरणात पुरेसा वेळ देता येतो, न्यायालयावरील प्रकरणांचे ओझे कमी होण्यास मदत होते असे सांगितले. इतके वर्ष प्रशिक्षणाकरीता उत्तान (ठाणे) येथे जावे लागत होते परंतु हे प्रशिक्षण इथेच उपलब्ध करून दिल्याबद्दल अॅड. प्रसाद पाटील यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे आभार मानले.

जिल्हा न्यायाधीश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश माणगाव एस.टी. भालेराव यांनी मार्गदर्शन करताना जास्तीत जास्त वकिल व पक्षकारांपर्यंत मेडिएशनचे फायदे पोहचवण्याचे आव्हान करून मेडिएशनद्वारे वाद सोडवताना काय करावे लागते, कशी परिस्थिती हाताळावी लागते त्याची थोडक्यात माहिती दिली.

या पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हा न्यायाधीश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, माणगाव एस.टी. भालेराव, आणि न्यायाधीश नगर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबई महेश जाधव हे मेडिएशनचे प्रशिक्षण देणार असून रायगड जिल्ह्यातील 38 वकिल उपस्थित राहिलेले आहेत.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलिबाग वकिल संघटनेचे खजिनदार अॅड.राजेंद्र माळी यांनी केले. ज्येष्ठ वकिल विनोद घायाळ, माणगाव यांनी उपस्थितांचे आभार म्हणून उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले आणि पुढील प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरूवात झाली.

याप्रसंगी अॅड. अनंत पाटील, उपाध्यक्ष, वकिल संघटना, अॅड. अमित देशमुख, सचिव, वकिल संघटना, रायगड अलिबाग व श्री. महेश दायमा, कोर्ट मॅनेजर आदी मान्यवर उपस्थित होते.

०००००००

संबंधित पोस्ट

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत एक दिवस गावकऱ्यासोबत उपक्रमाचा शुभारंभ विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी साधला ग्रामस्थांशी संवाद

चढ्या दराने मद्यविक्री, १७ विक्रेत्यांवर कारवाई;साडेआठ लक्ष रुपये दंड..

पर्यावरणीय दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर विकास आराखडा शिखर समिती बैठक; १७० कोटींच्या सुधारित विकास आराखड्यास मान्यता

शिऊर बंगला ते नांदगाव रस्त्याच्या कामाचे पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते भुमिपूजन…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक गट-बचाळणी परीक्षा २२ मार्च रोजी; ११६४० उमेदवारांची बैठक व्यवस्था..

तहसिलदारांच्या खुर्चीत शिपाई..! 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर तातू ठाकरेंचा अनोखा गौरव…