vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

पायधूनी पोलीस ठाण्याने मध्यप्रदेश येथील खुनाच्या गुन्ह्यातील 7 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीचा शोध घेऊन मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले 

*पायधूनी पोलीस ठाण्याने मध्यप्रदेश येथील खुनाच्या गुन्ह्यातील 7 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीचा शोध घेऊन मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले

 

मुंबई प्रतिनिधी-

पायधूनी पोलीस ठाण्याने मध्यप्रदेश येथील खुनाच्या गुन्ह्यातील 7 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीचा शोध घेऊन मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले

प्राप्त माहितीनुसार-मध्यप्रदेश राज्यातील जिल्हा कटनी येथून बरही पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रिषभसिंग बघेल, पो. शि. क्र. 669/अंकित बडगाईया, पो. शि. क्र. 675/दिलीप कोल यांनी पोलीस ठाणे समक्ष येऊन कळवले की बरही पोलीस ठाणे, जि. कटनी राज्य. मध्य प्रदेश येथे गु. र. क्र. 329/18 कलम 302, 294, 323, 324, 506, 147, 148 भारतीय दंड संहिता हा गुन्हा दाखल असून त्यातील पाहिजे आरोपी नामे राजाराम रामाधार तिवारी वय 35 वर्षे राठी. गावः पिपरा, पो. ठाणे. बरही, तालुकाः विजयराघवगड जिल्हाः कटनी, मध्यप्रदेश हा गेल्या 7 वर्षांपासून फरार असून तो पायधुनी पोलीस ठाणे हद्दीत असण्याची शक्यता असल्याने त्याचा शोध घेणे कामी मदत मागितली. सदरची माहिती मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ 2, मुंबई यांना दिली असता मा.पोलीस उपायुक्त, परिमंडळ-2, मुंबई, स.पो.आ.पायधुनी विभाग, पायधुनी पोलीस ठाण्याचे दिवसपाळी पर्यवेक्षक पो.नि.श्री अभिजीत शिंदे, पो . नि पगार, यांचे मार्गदर्शनाखाली स. पो. नि. रज्जाक शेख, पो. उप. नि. कल्पेश चव्हाण व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.ह. क्र. 081269/ठाकूर, पो. ह. क्र. 080204/शेंडे, पो. शि.क्र. 130288/इतापे यांनी नमूद पथकाच्या मदतीने सदर पाहिजे आरोपीचा शोध घेतला असता तो बाळगी हॉटेल जवळील फुटपाथ, पी डीमेलो रोड, मस्जिद बंदर पूर्व, मुंबई इथे मिळून आला असून त्यास पोलीस ठाणे येथे आणण्यात येऊन गुन्हयासंदर्भात त्याचेकडे चौकषी केली असता त्याचा गुन्हयात सहभाग निश्पन्न झाल्याने वर नमुद बरही पोलीस ठाणे, जि. कटनी येथील पोलीस पथकाच्या ताब्यात सदर आरोपीस दिले असता ते त्यास पुढील कारवाई करीता बरही पो.ठाणे जि.कटनी राज्य. मध्यप्रदेष येथे घेऊन गेले आहेत.

संबंधित पोस्ट

सोन्याच्या तस्करीप्रकरणी मुंबई सीमाशु्ल्क विभागाने दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक केली

अंधेरी पोलिसांचे मोठे यश – वृद्धांना फसवणारा दुष्ट आरोपी नाशिक येथून अटक, ६ प्रकरणे उलगडली

भिवंडी येथील  २२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल..

vishwatmaklokswamivarta

परराज्यातील अवैध मद्य वाहतूक प्रकरणी कारवाई; २ कोटी ३० हजाराचा मुद्देमाल जप्त

खुनाच्या गुन्ह्रात सक्रीय सहभागी असलेल्या एका जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने केली अटक

vishwatmaklokswamivarta

बेकायदेशीर बेटिंग ॲप्लिकेशन्सचा प्रचार केल्याबद्दल सक्त वसुली संचालनालयाकडून २९ जणांविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल. या आरोपींमध्ये प्रकाश राज, विजय देवरकोंडा, राणा दुगुपट्टी, निधी अग्रवाल, प्रणिता सुभाष या प्रसिद्ध कलाकारांसह इन्फ्लुएन्सर आणि युट्युबर्सचा समावेश