vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

उद्यमशिलतेतून महिलांनी सक्षम व्हावे  —जिल्हाधिकारी किशन जावळे

उद्यमशिलतेतून महिलांनी सक्षम व्हावे  —जिल्हाधिकारी किशन जावळे

 रायगड-अलिबाग,द प्रतिनिधी):-उद्यम शिलतेतून सक्षम व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भारतीय उद्योजकता विकास संस्था (ईडीआय) अहमदाबाद उदया प्रकल्प कार्यालय अलिबाग व टाटा कम्युनिकेशन्स मुंबई पुरस्कृत नावडे पनवेल को ऑफ इंडस्ट्रीज सभागृह पनवेल येथे (दि.11 नोव्हेंबर) रोजी आयोजित महिलांकरीता उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमात केले

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पनवेल तहसिलदार मिनल भांबरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळया, रायगड जिल्हा बँक तळोजाचे व्यवस्थापक नितेश तोंडसे, उद्योजक विजय लोखंडे, उद्योजक लक्ष्मण जाधव सामाजिक कार्यकर्त्या व उद्योजिका श्रीमती राजश्री पाटील उपस्थित होते.

भारतीय उद्योजकता विकास संस्था (ईडीआय) व टाटा कम्युनिकेशन्सच्या सामाजिक दायीत्व विभागाकडून पुरस्कृत उदया प्रकल्पांतर्गत दोन आठवडे कालावधीचे महिला व दिव्यांगांकरीता उद्योजकता विकास कार्यक्रम घेण्यात आला होता. कार्यक्रमात सर्व प्रथम ईडीआयचे प्रकल्प अधिकारी शशिकांत दनोरीकर यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांना पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

प्रशिक्षणामध्ये सहभागी प्रशिक्षणार्थींना जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात येवून नावडे येथील महिला प्रशिक्षणार्थीनी सुरु केलेल्या माऊली भाकरी सेंटर चे उद्‌घाटन जिल्हाधिकारी श्री.जावळे यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाकरीता रायगड जिल्हा बँकेचे व जिल्हा उद्योग केंद्राचे मोलाचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन ईडीआय अलिबाग प्रकल्प अधिकारी शशिकांत द‌नोरीकर यांनी केले. या कार्यक्रमाला महिला प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

संबंधित पोस्ट

नागरिकांनी एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार· जनसंवाद कार्यक्रमातंर्गत बठाण ग्रामस्थांशी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी साधला संवाद

रेणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा*

उत्तरकाशी भूस्खलन, पूरस्थिती; महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित, बहुतांश पर्यटक आज राज्यात परतणार-आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

रायगडमध्ये 14 फेब्रुवारीला शासकीय योजनांचा महामेळावा- विधी सेवा शिबिर, एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

काशीद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकाचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश**”रोबोटिक बोयो” ची उपयुक्तता पुन्हा झाली अधोरेखित*