vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाण्यात 15 नोव्हेंबर रोजी आदिवासी जनजागृती मेळावा व  आदिवासी सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन.

ठाण्यात 15 नोव्हेंबर रोजी आदिवासी जनजागृती मेळावा व  आदिवासी सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन.

 

ठाणे प्रतिनिधी: क्रांतीसुर्य बिरसा मुंडा व आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या संयुक्त जयंती निमित्त ठाण्यात आदिवासी जनजागृती मेळावा व आदिवासी सांस्कृतिक कला महोत्सव – 2025 चे आयोजन येत्या 15 नोव्हेंबर 2025 रोजी ठाण्याच्या खेवरा सर्कल, खेवरा फार्म हाऊस, संघटनेच्या मुख्य कार्यालयाच्या समोरील पटांगण, चितळसर – मानपाडा, घोडबंदर रोड, ठाणे ( पश्चिम ) येथे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात क्रांतीज्योत मिरवणूक, दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन, आदिवासी स्वागत गीत, मान्यवरांचे मार्गदर्शनपर भाषण, गौरी नाच, तारपा नाच, बोहडा सोंग, पाहुण्याचे स्वागत अशी महोत्सवाच्या कार्यक्रमाची रूपरेषा असून कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

     तरी जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी सदरील महोत्सवास दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संस्थापक तथा अध्यक्ष हंसराज खेवरा आणि संघटनेचे सदस्य सुनिल तुकाराम भांगरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

संबंधित पोस्ट

आताच मोठी बातमी-अतिवृष्टीचा फटका, सरकारकडून तातडीची मदत 🌧️ पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना ₹१०,००० आणि गहू-तांदूळ देण्यास सुरुवात. – मुख्यमंत्री फडणवीस सरकारकडून मदतकार्य वेगात सुरू!

नांदेड विमानतळ विकासासाठी प्रस्ताव तात्काळ सादर करा- पालकमंत्री अतुल सावे जिल्हाधिकारी कार्यालयात विमानतळ विकास कामांबाबत आढावा…

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठीअर्ज पाठविण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण कालावधीत वाढ..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा ठाणे क‌ाँग्रेस कडून निषेध  राहुल गांधी `रिस्पेक्टेड नेते’ – विक्रांत चव्हाण 

वीरबालदिवस निमित्त सायन येथील गुरूद्वारा गुरू तेग बहादूर दरबार येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta