vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यामध्ये दि.13 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

जिल्ह्यामध्ये दि.13 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

रायगड- प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दि.13 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग श्रीमती तेजस्विनी निराळे यांनी दिली आहे.

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेली, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी अपिले, मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रलंबित प्रकरणे तसेच ग्रामपंचायत यांच्याकडील घरपट्टी, पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, विजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर वित्तीय संस्था यांचेकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे सदर लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येतात.

दि.13 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग राजेंद्र सावंत यांनी केले आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात सन 2025 च्या तुलनेत सन 2026 मध्ये अपघातात घट 

vishwatmaklokswamivarta

आयपीएल विजेता रॉयल चॅलजर्स बंगळूरू संघाच्या विजयी सोहळ्या दरम्यान चेंगराचेंगरी होऊन किमान चार जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे, तर अनेक जण जखमी झाले

vishwatmaklokswamivarta

वटवृक्ष हनुमान मंदीर येथे जन्मोत्सव सोहळा आयोजित

१९३५ वर्ष पुरातन पार्श्वनाथ जैन मंदिर  पालिकेने तोडल्याने त्यांच्या  विरोधात अखिल भारतीय सकल जैन समाज यांचा आज मोर्चा…

vishwatmaklokswamivarta

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आता मुंबईतही होणारपर्यटन सुरक्षा दलाचा शुभारंभ  – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

जालना तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा