vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे आज (दि.१९)पासून निर्जलीकरण प्रशिक्षण

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे आज (दि.१९)पासून निर्जलीकरण प्रशिक्षण

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे बुधवार दि.१९ पासून पाच दिवस निर्जलीकरण (डिहायड्रेशन) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा युवक, युवती व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय अधिकारी सुदाम थोटे यांनी केले आहे.

 या प्रशिक्षणात तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये निर्जलीकरण (डिहायड्रेशन) चे प्रकार, त्यामधील उद्योग संधी, व्हेजिटेबल कटिंग मशीन, ग्राइंडर मशीन, पॅकिंग, पिलिंग मशीन, प्रोसेस लाईन, सेटअप मशीन सिलेक्शन, कच्चा माल, बाजारपेठ, निर्यात क्षेत्रातील उद्योग संधी, मालाची क्वालिटी टेस्ट याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्रात्यक्षिक प्रशिक्षणामध्ये मेथी पावडर, पालक पावडर, हिरवी मिरची पावडर, आले-लसूण पावडर, कढीपत्ता, पुदीना पावडर, बटाटा पावडर, चिकू फ्लेक्स, पायनॅपल फ्लेक्स तयार करणे यांचा समावेश आहे. या संधीचा स्वतःचा व्यवसाय करु इच्छिणाऱ्या युवक, युवती व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी सुदाम थोटे यांनी केले आहे.

 प्रवेशासाठी व अधिक माहिती संपर्कः- श्रीमती आशा कुरवडे :७८८८०७०४१९, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, विभागीय कार्यालय, A-38, MIDC परिसर, रेल्वे स्टेशन रोड,छत्रपती संभाजीनगर.

०००००

संबंधित पोस्ट

इस्त्राईलमध्ये रोजगाराची संधी…

जिल्हा व सत्र न्यायालय येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

दिल्लीत दीपस्तंभ मनोबल केंद्राचा शुभारंभ दिव्यांग, अनाथ आणि ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण…

vishwatmaklokswamivarta

राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

कर्जत तालुक्यातील जुना दगडी पूल वाहतुकीस तात्काळ बंदी

घर घर संविधान” कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी- सदस्य (सचिव दर्जा) गोरक्ष लोखंडे

vishwatmaklokswamivarta