vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

श्रीराम कृष्ण सेवा ट्रस्ट कल्याण तर्फे गरजूना अन्न धान्य व ब्लेन्केट वाटप

श्रीराम कृष्ण सेवा ट्रस्ट कल्याण तर्फे गरजूना अन्न धान्य व ब्लेन्केट वाटप

 राज्य प्रतिनिधी- कल्याणच्या श्रीराम कृष्ण सेवा ट्रस्ट तर्फे दर महिन्याला गरीब गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात येते कल्याण पश्चिम शहरात गेली ३५ वर्ष हा उपक्रम चालू असून अनेक गोरगरीब गरजूं या योजनेचा लाभ घेत असतात महिन्यातून एकदा हे धान्य वाटप केलं जातं त्याचबरोबर रोज दुपारी भुकेल्या लोकांना जेवण दिले जाते आधारवाडी च्या लोटस हॉस्पिटल समोर अन्नक्षेत्र असून येथे हे उपक्रम राबविले जातात.

 गुरूवार दि.२०/११/ २०२५, रोजी सकाळी ११.३० वाजता झालेल्या या उपक्रमात माजी नगरसेवक श्रेयस समेळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून त्यांच्या हस्ते गरजु लोकांना अन्नधान्य व ब्लेन्केट वितरण करण्यात आले ह्या प्रसंगी संस्थेचे संचालक श्री जसूभाई चंदाराणा, विनुभाई तन्ना, छबीलभाई कारिया, मितुलभाई देसाई, विष्णूकुमार चौधरी, भिखूभाई कारीया, राजूभाई विठलानी,राजीव चंदाराणा, तुषारभाई दाणी, रवी चौधरी, दयालभाई सजनानी,नटुभाई खिमानी, वंश चंदाराणा, मोनिश चंदाराणा आदी मान्यवरांच्या हस्ते अन्नधान्य सह ब्लेन्केट वितरण करण्यात आले. ह्या प्रसंगी मधुरीमा स्वीटवाले जिगीशभाई बारोट ह्यांनी वितरण साठी ब्लेन्केट दिल्या बदल त्यांचे खास आभार मानले.

ह्या ट्रस्ट चे संचालक ह्यांनी आव्हान केले आहे की ज्या कोणाला ह्या अन्न क्षेत्राचे सेवा कार्या मध्ये सहयोग करायचे असेल तर आपल्या वाढदिवसाच्या किंवा आपल्या पितृच्या पूण्यतिथी आणी घराचे चांगले प्रसंगी ह्या ट्रस्टला दान देवून आपण सहकार्य करावे. ह्या साठीसंचालक-श्री. जसुभाई चऺदाराणा-(मो.9320301501), श्री.छबीलभाई कारीया – (मो.9322403819) ह्यांना संपर्क करावा

000000

संबंधित पोस्ट

रिपब्लिकन पक्ष- खोरीप मुंबई महानगरपालिका निवडणूक 20 26 करिता पक्षाच्या उमेदवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आढावा बैठक संपन्न

फसव्या भरती संदेशापासून सावधान; आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल ठाणे जिल्ह्यातील “कल्याण” मध्ये संपन्न*

उन्हाळ्यात उष्मालाटेपासून बचावासाठी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अन्न व औषध प्रशासनाकडून आंबेगाव व खेड तालुक्यात ५ ठिकाणी धडक कारवाईकारवाईत १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त

केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांचा जिल्हा दौरा…