vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सकारात्मक ऊर्जेला अधिक प्रवाहित   — जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर-श्री गुरु तेग बहादुर साहिबजी समागम कार्यक्रमाच्या प्रसारासाठी-जिल्ह्यातील सोशल मीडिया इंफ्लुएंसर यांना आवाहन

सकारात्मक ऊर्जेला अधिक प्रवाहित   –– जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर-श्री गुरु तेग बहादुर साहिबजी समागम कार्यक्रमाच्या प्रसारासाठी-जिल्ह्यातील सोशल मीडिया इंफ्लुएंसर यांना आवाहन

नागपूर, प्रतिनिधी: हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम समारोहाचे भव्य प्रमाणात प्रथमच आयोजन होत आहे. सुमारे 5 लाख भाविक या निमित्ताने विदर्भातील सर्व जिल्ह्यातून येत आहेत. या समारोहाच्या व्यवस्थापनासाठी 25 पेक्षा अधिक विविध समित्या, विविध शासकीय विभाग प्रमुख अहोरात्र काम करीत आहेत. शीख समाजासह इतर समाजाचे मोठ्या प्रमाणात योगदान आहे. सर्वांच्या योगदानातून नवा इतिहास निर्माण करु पाहणाऱ्या या कार्यक्रमाच्या सकारात्मक उर्जेला अधिकाधिक प्रवाहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

कोणत्याही मोठ्या आयोजनात वेळेवर काही कमतरता उद्भवतात. यावर तात्काळ मात करता यावी यासाठी सर्व समित्यांना निर्देश दिलेले आहेत. याचबरोबर हा समारोह स्वंयशिस्तीचा, आपल्या सेवातत्परतेचा म्हणून पाहिला जात आहे. येथील प्रत्येक सहभागी हा त्याच जबाबदारीने सहभागी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागपूर मधील हा भव्य कार्यक्रम नवा आयाम निर्माण करणारा असेल. शासन, शीख व इतर धर्मीय समाज यांच्याबरोबर सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर अधिक जबाबदारीने आपल्या वार्तांकन व चित्रीकरणाबाबत काळजी घेईल, असेही ते म्हणाले.

नागपूर येथे 7 डिसेंबर रोजी होणाऱ्या या भव्य समागम कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

0000

संबंधित पोस्ट

सैलानी यात्रा महोत्सवाचे नियोजन करावे-   पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्व तयारीचा आढावा८ ते २३ मार्च दरम्यान यात्रा महोत्सव ४-५ लाख भाविक येण्याची शक्यता

vishwatmaklokswamivarta

नौसेनेमधून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांसाठी 23 जुलै रोजी मेळाव्याचे आयोजन

सेवा स्टॉल्सना उत्स्फूर्त प्रतिसाद भाविकांनी व्यक्त केले समाधान …

vishwatmaklokswamivarta

स्वस्ती निवास’ कौटुंबिक संवेदना जपणारे केंद्र म्हणून ओळखले जाईल नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटला सर्वतोपरी सहकार्य करू- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ‘एनसीआय’ला देशातील प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट करणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वस्ती निवास इमारतीचे भूमिपूजन

कृषी समृद्धी योजनेसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावे-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे

vishwatmaklokswamivarta

सायन कोळीवाडा येथील हार्बर रेल्वे लाईन गुरु तेग बहादुर स्टेशन फूटबोर्ड व लिफ्ट समस्या ज्येष्ठ नागरिक हैराण…

vishwatmaklokswamivarta