vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

चारचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांकांसाठीइच्छुकांनी अर्ज सादर करावेत

चारचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांकांसाठीइच्छुकांनी अर्ज सादर करावेत

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल येथे चारचाकी वाहनांसाठी चालू असलेली MH46DA ही मालिका संपुष्टात येणार असल्याने MH46DF ही नवीन मालिका सुरु करण्यात येणार आहे. यासाठी ज्यांना चारचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरुन हवे असतील त्यांनी दि.23 डिसेंबर 2025 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.00 ते दुपारी 02.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयांच्या खाजगी वाहन विभागात डीडी, निवासी पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल जयंत चव्हाण यांनी केले आहे.

एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दि.23 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 4.00 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. त्यानुसार एकाच नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज असतील तर त्या अर्जदारांनी त्याची नोंद घेऊन दि.24 डिसेंबर 2025 रोजी कार्यालयीन वेळेत दुपारी 2.30 वाजेपूर्वी त्यांच्या इच्छेप्रमाणे जास्तीच्या रक्कमेचा धनाकर्षण (DD) बंद लिफाफ्यामध्ये कार्यालयात जमा करावा अतिरीक्त धनाकर्षण कमीत कमी 301 रु.चा असावा त्यापेक्षा कमी रकमेच्या धनाकर्षण विचार केला जाणार नाही. या अर्जासाठी त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नवीन वाहन नोंदणी विभाग यांच्या दालनात लिलाव करण्यात येईल.

सदर धनाकर्षण (DD) RTO PANVEL यांच्या नांवे नॅशनलाईज्ड/शेड्युल्ड बँकेचा असावा, तो दोन महिन्यांपेक्षा जास्त जुना नसावा. अर्जदाराने अर्जासोबत पॅनकार्ड व आधारकार्ड साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील. लिलावाकरिता जमा करण्यात येणारा धनाकर्षण (DD) (फक्त एकच) या सिलबंद पाकीटात जमा करावा. आकर्षक क्रमांकासाठी आलेल्या अर्जासोवत असणारे धनाकर्षण अर्ज स्विकारणाऱ्या दिवसापासून दोन महिन्यापेक्षा जुने असलेलले धनाकर्षणाचे अर्ज बाद केले जातील. तसेच विहित शुल्कापेक्षा कमी रक्कमेचे असलेले धनाकर्षण (DD) सुद्धा बाद केले जातील. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 180 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकार जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी, कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही.

आकर्षक क्रमांकासाठी आगाऊं स्वरुपात अर्ज स्विकारत असून चालू मालिका संपल्याशिवाय, नवीन मालिका सुरु होणार नाही. तसेच आगाऊ प्रक्रियेमध्ये स्विकारलेल्या अर्जाच्या धनाकर्षणच्या पावत्या, जुन्या मालिकेतील पूर्ण नंबर संपल्याशिवाय नवीन मालिकेतील पावत्या जारी केल्या जाणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी.

(टीप :- लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदारांना https://fancy.parivahan.gov.in, या संकेत स्थलांद्वारे पसंती क्रमांक ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.)

000000

संबंधित पोस्ट

जालना शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि प्रशासकीय शिस्त लावण्यासाठी मनपा आयुक्त आशिमा मित्तल यांनी ‘ॲक्शन मोडवर’. अनधिकृत कामे आणि अतिक्रमणांविरुद्ध होणार कारवाई

शेख मोहसीनोद्दीन यांची काँग्रेसच्या शहर सचिव पदी नियुक्ती 

vishwatmaklokswamivarta

दहावीच्या विद्यार्थ्याने गिरवले प्रशासकीय कामकाजाचे धडे; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून “डे विथ कलेक्टर” उपक्रम प्रसादच्या जिज्ञासू वृत्तीचे व या उपक्रमाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले कौतुक

vishwatmaklokswamivarta

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकता नगर येथे एक स्मारक नाणे आणि टपाल तिकिटाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

जागतिक कौशल्य आशिया स्पर्धा 2025 मध्ये भारताची दमदार कामगिरी, पहिल्याच सहभागात पटकावला आठवा क्रमांक

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषीचा दर्जा – मंत्री पंकजा मुंडे महा पशुधन एक्स्पो २०२६ चे परळीत उद्घाटन, ३८ एकर क्षेत्रात विविध स्टॉलची मांडणी

vishwatmaklokswamivarta