vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वैजापूर येथील स्ट्राँगरूमची जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केली पाहणी

वैजापूर येथील स्ट्राँगरूमची जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केली पाहणी

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी) – वैजापूर येथील नगर परिषद निवडणुकीच्या मतपेट्यांची सुरक्षितता आणि मतमोजणी प्रक्रियेबाबत तयारी यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मतपेट्यांच्या स्ट्राँगरूमची पाहणी केली.

यावेळी त्यांनी प्रशासन, पोलिस यंत्रणा व निवडणूक कर्मचाऱ्यांना मतमोजणीच्या दिवशी कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. मतमोजणी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, सुरळीत आणि कायद्याच्या चौकटीत पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

स्ट्राँगरूमची सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रवेश-नियंत्रण तसेच कर्मचारी तैनातीची तपासणी केली.

मतमोजणीदरम्यान प्रत्येक टेबलवरील कामकाज ऑन-कॅमेऱ्यावर रेकॉर्ड करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक राहणार आहे.

याशिवाय माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याचे निर्देश देण्यात आले. मतमोजणीदरम्यान कोणत्याही उमेदवार किंवा प्रतिनिधींनी आक्षेप नोंदविल्यास ते शांततेत, नियमांनुसार आणि तत्काळ सोडवावेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी वैजापूर नगरपालिकाचे मुख्याधिकारी भागवत बिघोत, उपविभागीय अधिकारी अरुण जऱ्हाड, तहसीलदार नवनाथ वागवाड, उपस्थित होते.

000000

संबंधित पोस्ट

मूल्य साखळी भागीदारीसाठी शेतकरी उत्पादक कंपनी,सहकारी संस्थांनी अर्ज 

राष्ट्रीय विधी सेवा दिन, बालदिन व तंबाखूमुक्त युवा अभियान रॅली अलिबागमध्ये उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

शिक्षणमत्री धर्मेद्र प्रधान याच्या राजिनाम्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुग याच्या उपोषणाला खोरिपाचा पाठिंबा-

केंद्राकडे प्रलंबित असलेला रोजगार हमी योजनेचा निधी राज्यास तत्काळ मंजूर करावा- : रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

आज वेव्हज् परिषदेच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 1 मे रोजी मुंबईत

महाराष्ट्र शासनाचे चार, नऊ व पंधरा वर्षे मुदतीचे १००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta