vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी प्रवेशिकांचे आवाहन; 30 जानेवारीपर्यंत मुदत

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी प्रवेशिकांचे आवाहन; 30 जानेवारीपर्यंत मुदत

     अमरावती, प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने दिला जाणारा स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2025 साठी लेखक आणि प्रकाशकांकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रकाशित झालेल्या प्रथम आवृत्तीच्या पुस्तकांसाठी ही स्पर्धा असून, पात्र साहित्यिकांनी आपल्या प्रवेशिका विहित मुदतीत सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

   या योजनेअंतर्गत सन 2025 च्या पुरस्कारांसाठी प्रवेशिका सादर करण्याचा कालावधी 1 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 असा निश्चित करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील इच्छुकांनी आपल्या प्रवेशिका आणि पुस्तके या विहित कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे जमा करणे आवश्यक आहे. 30 जानेवारीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी केले आहे.

    जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेले अर्ज आणि पुस्तके खास दूतामार्फत किंवा टपालाने 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, प्रभादेवी, मुंबई यांच्या कार्यालयाकडे पाठविली जाणार आहेत. मराठी साहित्यातील विविध प्रकारांमधील उत्कृष्ट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

 

000000

संबंधित पोस्ट

धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी 15 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन* 

भाजप आमदार तमिळ सेल्वन यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींविरोधात सायन-कोळीवाडा येथे हजारो कार्यकर्ते सहभागी …

नमुंमपा निवडणूक निर्णय अधिकारी यांना धमकावणे ही गंभीर बाब – पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावा ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश • जनसंवाद कार्यक्रमात 110 हून अधिक निवेदने प्राप्त • महसूलमंत्र्यांचा नागरिकांशी थेट संवाद

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने चक्रीय अर्थव्यवस्थेचा आदर्श निर्माण केला – केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह देशातील १५ साखर कारखान्यांना सीएनजी युनिट उभारण्यास प्राधान्य देणार

परभणी विभागासाठी नवीन सी-बँड रडार मंजूर- राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta