vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात 30 डिसेंबर रोजी महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने तसेच नामांकन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने-कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिनियम कलम 36 अन्वये आदेश जारी

जिल्ह्यात 30 डिसेंबर रोजी महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने तसेच नामांकन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने-कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिनियम कलम 36 अन्वये आदेश जारी

 अमरावती, प्रतिनिधी): जिल्ह्यात 30 डिसेंबर रोजी महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने तसेच नामांकन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्यादिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवार नामांकन पत्र दाखल करण्याची शक्यता आहे. अशावेळी सभांचे आयोजन व मिरवणूक काढण्यात येतात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहेत. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 36 अन्वये सर्व पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील सर्व पोलिस ठाणेदार, अंमलदार व त्यांच्यावरील अधिकाऱ्यांना दि. 10 जानेवारी 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 36 अन्वये आदेश जारी करुन प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे अधिकार प्रदान करण्याचेआदेश पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी निर्गमित केला आहे.

 रस्त्यावरून जाणारी मिरवणूक सुरळीत ठेवणे, उपासनास्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळ्याचा संभव असेल तर अडथळा होऊ न देणे, सर्व मिरवणूकाच्या व जमावाच्या प्रसंगी व पूजा-अर्चा या ठिकाणी कोणताही रस्ता किंवा अडथळा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा न होवू देण्यासाठी याठिकाणी बंदोबस्त ठेवणे, सर्व रस्त्यांवर किंवा रस्त्यात, सर्व धाब्यावर आणि सार्वजनिक ठिकाणच्या कपडे धुण्याचा व उतरविण्याचा जागेच्या ठिकाणी व इतर सर्व सार्वजनिक किंवा लोकांच्या येण्याच्या जागेमध्ये बंदोबस्त राहण्यासाठी, वाद्यांबाबत नियम व नियंत्रण ठेवणे, सार्वजनिक जागेत ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत नियम व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सक्षम अधिका-यांनी या अधिनियमाच्या कलम 33, 35, 37 ते 40, 44 व 45 अन्वये कार्यवाही करावी, असे पोलीस आयुक्त यांच्या आदेशात नमूद केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अलिबाग**पूर ओसरल्यानंतरही सावध राहा!*नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये?

नमुंमपा निवडणूक निर्णय अधिकारी यांना धमकावणे ही गंभीर बाब – पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सेसफंड योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद इतर कामकाज – अल्पकालीन चर्चा भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवणार- मंत्री डॉ. उदय सामंत

कामातील सातत्य आणि पाठपुरावा हेच यशाचे रहस्य —-जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

बचत गटांना अर्थसहाय्य देऊन विकास कार्यक्रमांना गती द्या : जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक के. के. सिंग

vishwatmaklokswamivarta