vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मतदान यंत्राच्या प्रथम स्तर तपासणी कार्यवाहीची आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचेकडून पाहणी 

मतदान यंत्राच्या प्रथम स्तर तपासणी कार्यवाहीची आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचेकडून पाहणी

 

    नवी मुंबई प्रतिनिधी      नवी मुंबई महानगरपालिकेच्या 15 जानेवारी 2026 रोजी संपन्न होणा-या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक विषयक कामकाजाला वेग आला असून निवडणूकीसाठी आवश्यक मतदान यंत्राची प्रथम स्तर तपासणी (First Level Checking) वारकरी भवन येथील स्ट्राँग रुम येथे सुरु आहे. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी प्रथम स्तर तपासणीच्या ठिकाणी भेट देत तेथे सुरु असलेल्या कार्यप्रणालीची पाहणी केली. या प्रसंगी त्यांच्या समवेत इव्हीएम मशीन विषयक कार्यवाहीचे नोडल अधिकारी उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड, वाहन व्यवस्थेचे नोडल अधिकारी तथा परिवहन व्यवस्थापक श्री.योगेश कडुस्कर, कार्यकारी अभियंता श्री. प्रविण गाडे उपस्थित होते.

          नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 28 प्रभागांमध्ये 111 जागांसाठी निवडणूक होत असून 1148 मतदान केंद्रे आहेत. या करिता आवश्यक असणारी मतदान यंत्रणा मा.राज्य निवडणूक आयोगाकडून उपलब्ध्‍ करुन देण्यात आली असून त्याची प्रथम स्तर तपासणी राजकीय पक्ष प्रतिनिधीच्या समक्ष करण्यात येत आहे. या तपासणी प्रक्रियेची पाहणी करीत आयुक्तांनी बिनचूकपणे काम करण्याच्या सूचना दिल्या.

          उद्या 1 जानेवारीपासून निवडणूकीसाठी नेमलेल्या निवडणूक कर्मचा-यांच्या पहिल्या प्रशिक्षणास विष्णुदास भावे नाटयगृह वाशी येथे सुरुवात होत असून या प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करीत प्रशिक्षणास अनुपस्थित राहणाऱ्या व आदेशांचे पालन न करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल स्पष्ट करण्यात आलेले आहे.

0000

संबंधित पोस्ट

घरगुती गॅसचा पुरवठा नियमित, नागरिकांनी घाबरून जाऊ नये- जिल्हाधिकारी किशन जावळे*​दोन सिलिंडर बुकिंगमध्ये २५ दिवसांचे अंतर अनिवार्य; जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण,घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर केल्यास कारवाईचा इशारा*

ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापर मर्यादा शिथिलतेचे दिवस निश्चित.

vishwatmaklokswamivarta

सेवा पंधरवडा लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून साजरा करा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

बेटी बचाओ बेटी पढाओ’ राज्यस्तरीय अभियानाचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित-श्रीगणेशदर्शन स्पर्धा व दुर्गबांधणी स्पर्धेचे 26 फेब्रुवारी रोजी पारितोषिक वितरण

महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला गौरवशाली इतिहास- सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर दि.महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचा २६ वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात..

vishwatmaklokswamivarta