vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन 

बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन

बुलढाणा प्रतिनिधी: अनेक पिढ्यांच्या उद्धारकर्त्या व शिक्षणाची जगन्माता सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने शनिवार, ३ जानेवारी २०२६ रोजी विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्यात्या राजेश्रीताई सचिन गायकवाड यांचे व्याख्यान होणार आहे.

हा कार्यक्रम शनिवार, ३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता पत्रकार भवन, बुलढाणा येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. अभिलाष माळी (वैद्यकीय सर्जन) तसेच देवांगणाताई अमित ठाकरे (नगरसेविका, नगर परिषद बुलढाणा) उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार सुरेखाताई सोमनाथ सावळे असतील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश प्रतिनिधी गणेश निकम तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज वाघ करणार आहेत.

सावित्रीमाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करणाऱ्या या कार्यक्रमास नागरिकांनी, पत्रकार बांधवांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

अमरावतीत 24 मार्चला भव्य रोजगार मेळावा; टीसीएस मध्ये नोकरीची संधी

उद्योगांना आवश्यक कौशल्यधारक मनुष्यबळ उपलब्धतेसाठीशासन कटिबद्ध- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

निवासी अतिक्रमणांचे नियमानुकूलन; महसूल कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण …

चालू वर्षात जिल्हा नियोजनचा ७४४ कोटी रुपये निधी मंजूर**गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवावी – पालकमंत्री शंभूराज देसाई*

जमीन महसूल थकबाकीसाठी मालमत्तेचा जाहीर लिलाव 17 मार्चला

आषाढी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आरोग्य सेवेचा दिलासा! मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षामार्फत दोन ठिकाणी चरणसेवा उपक्रमांचे आयोजन