vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

 

    अमरावती, प्रतिनिधी: आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा सन 2025-26 चा उद्‌घाटन सोहळा आज संपन्न झाला. या स्पर्धेचे उद्‌घाटन राज्य माहिती आयोग आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडाध्वजाचे ध्वजारोहण करुन क्रीडाज्योत प्रज्ज्वलित करण्यात आली.

   आदिवासी विकास अपर आयुक्त आयुषी सिंह, नाशिकचे अपर आयुक्त दिनकर पावरा, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अमित रंजन, झेनिच चंद्र दोनथुला, सिद्धार्थ शुकना तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आदिवासी कला व संस्कृतीचे दर्शन घडविणारी भव्य हस्तकला प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या दालनांमध्ये अमरावती विभागातील धारणी, अकोला, पुसद, कळमनुरी, किनवट तसेच शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, धारणी यांनी सहभाग नोंदविला. याशिवाय नागपूर विभागातील देवरी प्रकल्पातील चिमुकल्यांनी तयार केलेल्या विविध कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन विशेष आकर्षण ठरले. या हस्तकला दालनांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

    उद्‌घाटन समारोपाच्या कार्यक्रमात अमरावती विभाग विरुद्ध नाशिक विभाग यांच्यातील हॉलीबॉल सामना अत्यंत चुरशीचा झाला. पहिल्या सेटमध्ये अमरावती संघाने 25 गुण, तर प्रतिस्पर्धी संघाने 20 गुण मिळविले. दुसऱ्या सेटमध्ये अमरावती संघाने 25 गुण, तर प्रतिस्पर्धी संघाने 18 गुण प्राप्त केले. उत्कृष्ट सांघिक खेळ व दमदार कामगिरीच्या जोरावर अमरावती विभागाचा संघ विजयी ठरला.

   संपूर्ण कार्यक्रमातून आदिवासी विद्यार्थ्यांमधील क्रीडा कौशल्य, सांघिक भावना, शिस्त तसेच आदिवासी हस्तकलेचा समृद्ध वारसा अधोरेखित झाला.

0000000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका-प्रसिध्दीकरिता – व्यापक जनसहभागातून नवी मुंबईत ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा  

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून नागरिकांमध्ये शासनाबाबत विश्वासनिर्मिती- कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा· महसूल विभागाचा अभिनव उपक्रम

महाराष्ट्र एमएसएमई समिट व पुरस्कार २०२६ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट यात्रेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

चिखली तहसील कार्यालयामार्फत ‘समाधान शिबिराचे’ आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

जलसंधारणासाठी जालन्यात एकजूट; ‘महा वॉकेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद जलसंधारण दिनानिमित्त ‘महा वॉकेथॉन’ संपन्न