vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबईचा सर्वांगीण विकास व्हावा याला आम्ही कायमच प्राधान्य दिले आहे. येथील भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा निर्णय आम्ही घेतला – एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख

नवी मुंबईचा सर्वांगीण विकास व्हावा याला आम्ही कायमच प्राधान्य दिले आहे. येथील भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा निर्णय आम्ही घेतला – एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख

नवी मुंबई प्रतिनिधी-नवी मुंबईचा सर्वांगीण विकास व्हावा याला आम्ही कायमच प्राधान्य दिले आहे. येथील भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा निर्णय आम्ही घेतला. अटल सेतू द्वारे नवी मुंबई मुंबईच्या अधिक जवळ आणली, नवी मुंबईत विमानतळ तयार झाल्यामुळे या शहराला आंतरराष्ट्रीय ओळख मिळणार असल्याचे याप्रसंगी नमूद केले. तसेच रस्ते, उद्याने, मेट्रो सेवा, वेगवेगळ्या समाजाची भवने उभारण्याचे काम केले असल्याचे यावेळी अधोरेखित केले. विकासाचा हाच वेग कायम ठेवायचा असल्यास आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला संधी द्यावी असे आवाहन नवीमुंबईकर नागरिक बंधू भगिनींना केले.

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर #ऐरोली विधानसभा मतदारसंघात #शिवसेना पक्षाचा वतीने आज आयोजित करण्यात आलेल्या रोड शोला नवीमुंबईकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. यावेळी आगामी मनपा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा महानगरपालिकेवर फडकवण्याचा संकल्प करण्यात आला.

दिघा गाव, ईश्वर नगर, राम नगर, दिघा तलाव, विष्णू नगर एमआयडीसी, यादव नगर मार्गे साठे चौक, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, कोपरी तुर्भे अशा विविध भागांतून रॅली काढण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिक आणि लाडक्या बहिणींनी जागोजागी उत्फूर्तपणे माझे स्वागत करून माझ्यावर फुलांचा वर्षाव करून माझे औक्षण केले.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शिवसेना उपनेते विजय नहाटा, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, किशोर पाटकर, अंकुश कदम, युवासेनेचे ममीत चौगुले तसेच शिवसेना उमेदवार, पदाधिकारी, शिवसैनिक आणि नवीमुंबईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

नुकसानीचे पंचनामे तात्काळ पुर्ण करा भरपाई आराखडे त्वरीत सादर करा-पालकमंत्री शंभूराज देसाई

सत्यमेव जयते फार्मर कपचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

दादर आयटीआयमध्ये ऑगस्ट २०२६ सत्रासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

देशभरातली बारा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात, मतदार यादी विशेष सखोल फेरतपासणी मोहिम उद्यापासून होणार सुरु -मुख्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषदेत घोषणा.

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद, ठाणे-*अनधिकृत शाळांपासून सावधान; मान्यताप्राप्त शाळेतच प्रवेश घ्या – शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे*

शिधावाटप विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई;वाडीबंदर परिसरातून ४५१ सिलिंडरसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त