vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हिंद दी चादर शहीदी समागम कार्यक्रमासाठी विविध २० ठिकाणांहून मोफत बससेवा-भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

हिंद दी चादर शहीदी समागम कार्यक्रमासाठी विविध २० ठिकाणांहून मोफत बससेवा-भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

नांदेड, प्रतिनिधी: “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथील मोदी मैदानावर दिनांक २४ व २५ जानेवारी, २०२६ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास भाविक व नागरिकांना सहजपणे उपस्थित राहता यावे, यासाठी शहर व परिसरातील एकूण २० ठिकाणांहून मोदी मैदानापर्यंत मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे

ही बससेवा रेल्वे स्टेशन, बसस्थानक, पासदगाव-तरोडा नाका, सांगवी-चैतन्यनगर, शंकरराव चव्हाण चौक-साठेचौक, सिडको-लातूर फाटा, धनेगाव-वाजेगाव, राजकॉर्नर-शिवाजीनगर, सराफा चौक-जुना कौठा मोंढा, ढवळे कॉर्नर-सिडको, लिंबगाव-छत्रपती चौक-मोर चौक, नाळेश्वर, आसना-राजकॉर्नर, विष्णुपुरी, कामठा-नमस्कारचौक, हडको, निळा-जयभवानी चौक, सोनखेड-वाडीपाटी-विष्णुपुरी, उस्माननगर-वडगाव-सिडको तसेच मारतळा-जवाहरनगर-तुप्पा-चंदासिंग कॉर्नर येथून मोदी मैदान येथील कार्यक्रम स्थळापर्यंत देण्यात आली आहे.

या मोफत बससेवेचा लाभ घेवून सर्व भाविक व नागरिकांनी “हिंद दी चादर” शहीदी समागम कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
00000

 

संबंधित पोस्ट

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध विभागात एकूण २ लाख ४० हजार ५४९ मतदार

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक, खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना त्रैमासिक विवरणपत्र तात्काळ सादर करण्याचे आवाहन

एसटी महामंडळाचा उपक्रम;-प्रवाश्यांच्या समस्या निराकरणासाठी प्रत्येक बुधवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन

केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना माहिती भरण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना-मुदतवाढीची ती बातमी खोटी

सॉल्वेंट व धोकादायक केमिकल वापरासाठी परवानगी न घेतलेल्या उद्योगावर फौजदारी गुन्हा दाखल करा    – जिल्हाधिकारी अशोक काकडे